पानोडी l झुंजार न्यूज
सहकाराचे जनक सहकारमहर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व मा. खा. बाळासाहेब विखे पाटील, ना. राधाकृष्णजी विखे पाटील ह्यांचा समर्थ वारसा पुढे चालवणारे मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील ग्रामीण भागातील अडचणींच्या मुळाशी जाऊन त्यावर मात करण्याची जिद्द, ही मा.खा.डॉ. सुजय विखे यांच्या कामकाजाची खासियत मानावी लागेल.

आपल्या जीवनाच्या प्रारंभीपासूनच डॉ. सुजय यांना आजोबा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून राजकारणासह समाजसेवा व सहकाराचे बाळकडू मिळाले. परफेक्ट नियोजन आणि आत्मविश्वास यामुळेच डॉ. सुजय विखे यांची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण झाली. सन १९८२ मध्ये विखे कुटुंबामध्ये जन्मलेल्या मा.खा. डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील न्यूरोसर्जन ही पदवी पूर्ण केली. राजकीय वारसा असतानाही ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरू लागले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करताना शेती आणि शेतीशी संबंधित सर्वसामान्यांना येणा-या अडचणींचा मुळापासून अभ्यास करण्याची सवय त्यांना लागली. हीच सवय पुढे त्यांना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यास उपयोगी पडली.

खा. डॉ. सुजय विखे यांच्याकडे असलेल्या कौशल्याची चुणूक वडील मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील हे लढवित असलेल्या निवडणुकांमधून दिसली.

राजकीय वारसा असलेल्या डॉ. सुजय यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करताना जिल्ह्यात युवा कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारले. खा. डॉ. सुजय विखे पाटील ह्यांना मानणारा खुप मोठा जनाधार आहे व त्यामध्ये युवकांची संख्या जास्त आहे. डॉ. सुजय विखेंना भाषणाच्या खास शैलीमुळे सोशल मिडीयावर त्यांना फॉलो करणारा वर्ग ही मोठा आहे. विखे पाटील परिवाराने जोपासलेल्या सामाजिक जाणीवांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे युवा नेते वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च न्यूरो सर्जन ची पदवी प्राप्त करून रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार करून देणारे देवदूत जलक्रांती , भक्तीपीठ ते शक्तीपीठ अशी पन्नास हजार महिला भगिनींची तीर्थ यात्रा घडणवण्याचे विखे पाटील परिवाराने कार्य केले.

काल महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल जाहीर झाले. ना राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयासाठी मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी सभा तसेच मतदारसंघात प्रचार फेरी, मतदारांच्या व्यक्तिगत समस्या जाणून घेऊन, व्यक्तिगत भेटी घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विकास कामाचा आलेख मतदारांसमोर ठेवला त्यामुळे जागृत मतदारांनी विरोधकांना आसमान दाखविले व ना. राधाकृष्ण विखेंना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

अभियानाचे पुरस्कर्ते तसेच मोफत अपघात विमा योजना यशस्वी करून लाखो कुटुंबांचा आधारस्तंभ ठरलेले व्यक्तिमत्व जिल्ह्यातील आतापर्यंत अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात पुढे करून त्यांना उभारी देणारे संकट मोचक. लेक वाचवा अभियाना अंतर्गत बेटी वाचवा संदेश देतानाच महिलांचा सन्मान करून सामाजिक जबाबदारी मिळणारे कृतिशील माणूस वर्तमानातील आव्हानांना सामोरे जाताना भविष्याचा अचूक अंदाज बांधणारा, शेती, सहकार, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नासाठी सदैव एक पाऊल पुढे टाकणारा दादा माणूस म्हणजे युवा नेते मा. खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आहेत.

ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या विजयात विखे कुटुंबियामधील मा. खासदार डॉ. सुजय विखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सौ. धनश्रीताई विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. ना. विखे पाटील यांच्या या विजयात विखे कुटुंबाबरोबर साहेबांना गावा गावातील कार्यकर्ते यांची देखील मोठी साथ मिळाली. विधानसभेच्या कालच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देखील आपल्याला मा. खासदार डॉ सुजय दादांकडे पाहता येते. युवकांचे प्रेरणास्थान मा. खासदार डॉ. सुजय दादा मतदारसंघात अविरतपणे जनतेच्या समस्येची सोडवणूक करतात तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात दादा नेहमी सहभागी असतात विखे घराण्यातून चालत आलेला कृषी, सहकार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्याचा वारसा मा. खासदार डॉ सुजय दादा समर्थपणे चालवीत आहेत. त्यांचे हे कार्य असेच जोमाने सुरु राहून त्यांच्या हातून उज्वल समाजसेवा घडत राहो यासाठी त्यांना दिर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, हिच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!
पत्रकार राजेश गायकवाड ( 7020493305 )

