{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई l झुंजार न्यूज

महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणीची नारी शक्ती; सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्यासोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने ‘महायुतीला भरघोस मतदान ‘केल्यामुळे महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. ‘नरेंद्र मोदींनी केलेला आहे देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे 
महायुतीच्या विजयाचा विकास; आज आम्हाला दिसत आहे निळ निळ आकाश; महाविकास आघाडी झाली
आहे भकास’, अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे. 
महायुतीच्या सराव घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *