संगमनेर l झुंजार न्यूज
सत्यशोधक समाजाचे प्रणेतेक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्ताने संगमनेर शहरातील माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचितआमदार अमोल खताळ व त्यांच्या सौभाग्यवती सौ नीलम खताळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
संगमनेर शहरातील माळीवाडा या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महायुतीचे संगमनेरविधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आ अमोल खताळ यांनी माळी समाज बंधू आणि भगिनींना दिले
यावेळी माळी पंच ट्रस्टचे अध्यक्ष किशोर ढोले राजू मताडे संपत गलांडे सोमनाथ गलांडे किसन गलांडे संदीप दफेदार अमित मंडलिक प्रसाद गोरे माजी अध्यक्ष बाळासाहेब अभंग अतुल अभंग मच्छिंद्र ढोले सुनील ढोले धनंजय मंडलिक संजय अभंग आशिष ताजने महेश मांडेकर सौ रेखा गलांडे पायल ताजणे सुरणा ताजने निलिमा गलांडे संगीता मंडलिक सुनीता माताडे आदींसह माळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
