आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या पिंप्री लौकी अजमपूर येशील शेतकरी बाळासाहेब रामभाऊ लावरे यांनी संशोधित केलेल्या तीन पिक वाणांचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली येथे नोंदणीकरण झाल्याने ग्रामिण भागातील इतर शेतकऱ्यांना गावरान शेती करण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे .

मानवी जीवनावर होणाऱ्या वाढत्या रोगराईमुळे विविध प्रकारची आजाराला आळा घालण्यासाठी एका खेडे गावातील लावरे या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तूर , वांगी , भोपळा या गावरान वाणांवर प्रयोग करून या तीन वाणांची निर्मित आठ वर्ष संशोधन करून या तीन वाणांचे तुरू या पिकाची सिंधु , वांगी या पिकांचे परिगा तर भोपळा या पिकांचे सोहम या नावाने नोंदणीकरण केली
त्यात झाले आहे

या वाणांची वैशिष्टे अशी की , १ ) तुर ( सिंधु ) कमी कालावधीत तयार होणारे वाण असून नांरंगी रंगाची फुले , जांभळ्या रंगाची दर्जेदार दाणे , चवीला रूचकर तर ही तुर दाळ खाल्याने पित्त होत नाही

२) वांगी ( परिगा ) वाणाची वैशिष्टे म्हणजे फळाच्या देठाला, पानाला, फांदीला अजिबात काटा नाही , वांग्याचा आकार गोल , वांगी फळाच्या देठाला सात पाकळ्या असून चवीस रुचकर लागते तर ३ ) भोपळा ( सोहम ) या वाणावर हिरवे पट्टे असून खाण्यास चवदार तर या वाणामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास उपयुक्त असल्याचे लावरे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


शेतकरी वाण म्हणजे काय? शेतकरी वाण म्हणजे शेतकऱ्याने आपल्या शेतात वर्षानुवर्षे घेतलेल्या पिकांतून एक नवीन तयार झालेल्या वनस्पतीचा समूह किंवा जे नावीण्य, एकसारखेपणा व उत्पादनात स्थिर असलेले वाण होय. या वाणाचे बियाणे बाजारात १ वर्षापेक्षा जास्त काळ उपलब्ध नसावे. (४ वर्षे भारताबाहेर, व ६ वर्षे फळ झाडांसाठी.) शेतकरी वाण संरक्षणाचे फायदे एखाद्या शेतकऱ्याने स्वतः तयार केलेल्या वाण नोंदणीकृत झाल्यास, त्या वाणासंबंधीचे सर्व हक्क शेतकऱ्याला प्राप्त होतात. त्यामध्ये बिजोत्पादन घेणे, बाजारात एखाद्या ब्रॅण्डसाठी विकणे, आयात-निर्यात करता येते. त्याच प्रमाणे अन्य एखाद्या व्यक्तीने त्यांचा बेकायदेशीर वापर केल्यास कारवाई करण्याचा हक्क प्राप्त होतो.


