मुंबई l झुंजार न्यूज
महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पण आता चित्र काहीसे बदलल्याची स्थिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला महाराष्ट्रातील जातीय समीकरण साधायचे आहे. मराठा आरक्षणात भाजपचे हात पोळलेत. त्यामुळे हा भगवा पक्ष फडणवीस यांच्या नावावर अत्यंत सावधपणे पुढे जात असून महाराष्ट्रात भाजपामधूनचं मराठा चेहरा देण्याची चाचपाणी सुरु असल्याचे ही चर्चा दिसून येत आहे .
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी विस्तृत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 40 मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत विनोद तावडे यांनी शहा यांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनासंबंधी जो फिडबॅक दिला, तो फडणवीस यांच्या बाजूने नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करण्यास विलंब होत असल्याचे समजत आहे , महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे फिक्स आहे. पण तो कोण होणार? हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. विनोद तावडे व अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या जागी अन्य एखाद्या नावावर विचार करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ , राधाकृष्ण विखे पाटील , रविद्र चव्हाण अशी नावे समोर येत आहे .
यासंबंधीच्या वृत्तानुसार, विनोद तावडे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याच्या स्थितीत मराठा समाज नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री दिला तर मराठा समाज नाराज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामु्ळे भाजप नवे समीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहे. विनोद तावडे स्वतः महाराष्ट्रातील बडे नेते आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष तळागाळापर्यंत काम केले आहे. विशेषतः ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व बिहारचे प्रभारीही आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाला त्यांच्या फिडबॅककडे दुर्लक्ष करणे अवघड झाले असून विनोद तावडेसह मुरलीधर मोहोळ , राधाकृष्ण विखे पाटील , रविद्र चव्हाण यांच्या नावाची ही चर्चा सुरु असल्याने पुढे भाजपा केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्र देणार नाही अशी राजकिय वर्तुळात चर्चा होवू लागली आहे .
दुसरीकडे, भाजपच्या वर्तुळात महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीससह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहेत. या 4 नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळावर चर्चा झाली. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावही निश्चित केल्याचे त्यांच्या देहबोलीवरुन समजते तूर्त, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर आहेत मात्र पुढे अडचणी येवू नये म्हणून केंद्रीय भाजप नेतृत्व सावधगिरीने पाऊल टाकत आहे . मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा पंतप्रधान मोदीच्या कोर्टात गेला असून पंतप्रधान मोदी हे दोन दिवशीय ओडीसा येथे असल्याने शनिवार रात्री अथवा रविवारी निर्णय होण्याची शक्यता आहे .
संध्यातरी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून संभाव्य मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे , राधाकृष्ण विखे पाटील , मुरलीधर मोहोळ , रविंद्र चव्हाण यांची ही नावे चर्चत असून 2022 ला फडणवीस ऐवजी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देवून जसा धक्कातंत्र देण्यात आला तसाचं आता सुध्दा ही पुर्नवृत्ती होवू शकती .

