{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई l झुंजार न्यूज

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची सात दिवस होवून ही घोषणा होत नसल्याने एकच चर्चा होवू लागली आहे. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक खबर समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीबरोबर गृहमंत्रिपद हवे आहे . गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे.

आता मुख्यमंत्री पदावर नव्हे तर गृहमंत्रीपदावर दावा  – विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे ५७ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं मानलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे, मात्र ते गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याची माहिती आता समोर आली आहे.
शनिवार रविवारी कुठल्याही बैठका नाही –  प्राप्त माहितीनुसार ५ डिसेबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी रवाना झाले आहेत. शनिवार रविवार महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीत.
१२ ते १३ मंत्रीपद – सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसले आहेत. गृहखातं मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदेंना गृह खात मिळणार का – अशा स्थितीमध्ये
एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळणार का? नाही मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed