{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

 

मुंबई l झुंजार न्यूज

 

 

विधानसभेला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर १२ दिवसाच्या राजकिय झुंजीनंतर अखेर सत्ता स्थापनेचा तिढा सुटला अन् राज्याच्या शिंदे , पवार या उपमुख्यमंत्रीपदासह मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होणार , तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेते, सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला मुंबईतील आझाद मैदान सज्ज झाल्याचे दिसत आहे.

 

 

 

भाजपचा विधिमंडळ पक्षनेता कोण होणार यावरुन अनेक तर्क वितर्क काढले जात होते विधानसभेच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या अनेक दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुध्दा झाल्या अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यातच पडली. बुधवारी सकाळी त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर, ‘कौन बनेगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ या चर्चेला अखेर पूर्णविराम झाला. त्यानंतर फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण ही दिले. यावेळी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन हजर होते  

 

 

 

राजशिष्टाचार विभागाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर , रिपब्लिकन नेते तथ  केद्रयाय मंत्री रामदास आठवले सर्वांना महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यासह  राज्यातील विरोधी पक्षनेत्यांसोबतच इतर राज्याचे मुख्यमंत्री , पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांनासुद्धा राज शिष्टाचार विभागाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

आझाद मैदानात होणाऱ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच १० पोलीस उपायुक्त, २० सहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, १५० सहाय्यक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह १५०० हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा

यंत्रणाही सज्ज असणार आहेत. याशिवाय आझाद मैदान परिसर हा ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला असून आजूबाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत. शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *