{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

प्रा. प्रदीप पाटील ( साहित्यीक / कवी, सामाजिक कार्यकर्ता )

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज 

 

 

 

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल धक्कादायक आगलेत, यात शंका नाही. पण त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे जेष्ठ व निष्ठावंत नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला हे अत्यंत धक्कादायक व अनाकलनीय होते, त्या निकालाच्या दिवशी महाराष्ट्रीयन जनतेचा निकालावर व दूरदर्शनच्या बातम्यांवर विश्वासच बसत नव्हता, जनता अविश्वास व चिंतेत होती, हे अस कस होऊ शकतं.

 

 

 

 

पाऱ्या सारखा स्वच्छ व आरशा सारखा निर्मळ असा राजकारणातील सुसंस्कृत-सभ्य माणुस, सह्याद्री एवढं प्रचंड काम करुन निवडणुक हारु शकतो आणि मतदार राजा एवढा कृतघ्ण होऊ शकतो यावर हैराण होण्यासारखी स्थिती आहे. हे लोकशाहीसाठी धोकेदायक आहे.

 

 

स्वातंत्र्य सैनिक व सहकार महर्षि कै. भाऊसाहेब थोरातांचा कामाचा प्रचंड वारसा व सुसंस्कृतपणा रक्तातच असलेला हा नेता १९८५ ला पहिल्यांदा आमदार होतो. सतत ४० वर्षे आमदारकी करुन राज्यमंत्री, मंत्री, प्रदेश अध्यक्ष, कॉग्रेस वींग कमिटी सदस्य आणि भावी मुख्यमंत्री होणाऱ्या या व्यक्तीने संगमनेर मतदार संघ व महाराष्ट्राच्या विकासासाठी भरपुर योगदान दिले आहे.

 

 

रचनात्मक व पारदर्शक कार्यपध्दतीने प्रत्येक खात्यात आपला ठसा उमटविलेला आहे. हा नेता कृषी खाते असो, शिक्षणमंत्री असो वा महसुल खाते असो, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षकांपासून त्या त्या खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आदरयुक्त भिती व सन्मान त्यांनी कायम ठेवला आहे.

 

 

 

पश्चिम महाराष्ट्रात बारामती तर उत्तर महाराष्ट्रात संगमनेर ‘रोल मॉडेल’ म्हणून विकासाच्या बाबतीत जनतेसमोर आले आहे. निळवंडे धरण, साखर कारखाना, दुध संघ, बँक, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, मेडीकल कॉलेज, यशोधन कार्यालय . कोण-कोणत्या कामाची पावती संगमनेरच्या जनतेला हवी. संगमनेरचे रस्ते, हायवे, आंतरराष्ट्रीय विमानतळा सारखे बस स्थानक, तरी हा नेता पडतो हे आश्चर्यकारक आहे. आणि वागणे, बोलणे, चालणे किती विनम्र, कधी कुणावर रागावणे नाही, शांत, संयमी हे नेतृत्व.

 

 

 

 

जनतेला विकास नाही तर पैसा, धर्म, सांप्रदायीकता, फुट या गोष्टी रुजायला लागल्यात हे या विधान सभेच्या निकाला वरुन समोर आले आहे,

 

काला साहेबांची भेट घेतली, त्यांचा संवाद मेळावा होता, किती धिरगंभीर हा माणुस. एवढा विकास करुन शांत-संयमी तर आहेच पण पराभवाचे कारण स्वतः आपल्यावर घेऊन जनतेला पुढील काळात गाफील न राहता सतत कार्य व संघर्षशील राहण्याचे आवाहन करतो. ‘सलाम’ आहे थोरात साहेबांना

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *