काँग्रेसच्या वतीने काढलेल्या मोर्चावर आमदार खाताळ यांची टीका

 

 

 

संगमनेर | झुंजार न्यूज

 

 

आत्तापर्यंत जे हिंदुत्ववादी आंदोलने व मोर्चे निघाले त्यामध्ये आपण कायमच सहभागी होत होतो. मात्र ते कधीही त्यात सहभागी झाले नाही परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली असून त्यांचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना आता हिंदुत्वाची आठवण यायला लागली असल्याची टीका महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर केली

 

 

 

 

 

सकल हिंदू समाजाचा मोर्चा संपल्या नंतर आमदार अमोल खताळ काही वेळ शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीसाठी थांबले होते.त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कुठलेही राजकारण न आणता सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा निघणार होता. त्यामुळे त्यांनी या मूक मोर्चाच्या अगोदर मोर्चा काढणे हे दुर्दैव आहे त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मोर्चा काढला हा प्रकार केविलवाना वाटत असल्याचीटीका आमदार खताळ यांनी केली

 

 

 

 

 

आतापर्यंत त्यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यापैकी तीन वेळा त्यांची मतदान ईव्हीएम मशीनवरती झाले, लोकसभेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तसेच कर्नाटक राजस्थान व इतर राज्यात काँग्रेसचे सरकार आले त त्यावेळी त्यांना ईव्हीएम वर शंका आली नाही मात्र आत्ताच त्यांना ईव्हीएमवरती शंका येऊ लागली आहे हे त्यांचे दुर्दैव आहे लोकशाहीमध्ये झालेला पराभव हा मान्य करून तो स्वीकारायचा असतो परंतु ईव्हीएमला दोष देणे अत्यंत दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली

 

 

 

 

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ज्या ठिकाणी त्यांनी ईव्हीएम मतमोजणी पुन्हा करण्यासाठी अर्ज दिला आहे तिथे त्यांनी मोजणी केली तरी माझी मते कमी निश्चितच वाढतील.परंतु त्यांना ज्या मोह ल्यात अगर गावात जास्त मते मिळाली त्या भागातची सुद्धा त्यांनी मोजणी केली तर ते चांगलं राहील असे खुले आव्हान आमदार खताळ यांनी विरोधकांना दिले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *