{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

बांगलादेशात काही महिन्यांपासून मोठा हिंसाचार उफळाला असून त्यात कित्तेक हिंदूंना आपले जीव गमवावे लागले आहे. हिंदू मंदिरे पाडली जातं असल्याच्या आणि हिंदू अस्मितेवर हल्ला होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला 
बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू वर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रो-हाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले आहे. सदरील घटनेचा निषेध एकराष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे. बांग्लादेशमध्ये ४ ते २० ऑगस्ट दरम्यान ५० जिल्हांमध्ये हिंदू समाजावर २००० हून अधिक जातीय हल्ले झाले असल्याच्या बातम्या रोज येत आहेत. मंगळवारी सकाळी नगर पालिके समोरील शास्त्री चौकातून या मोर्चास सुरवात झाली. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढलेल्या या निषेध मोर्चात सर्व पक्षाचे आणि संघटनेचे लोक सहभागी झाले होते. शास्त्री चौकातून निघालेल्या या मोर्चाचा समारोप संगमनेरचे प्राताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देऊन झाला. 
या निवेदनात बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन हिंदू हितासाठी योग्य ती पाऊले उचलावी अशा आशयाचे निवेदन प्राताधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांच्यासह विविध संघटना, हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *