{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

काँग्रेस नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे निवेदन

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

 

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून संगमनेर शहरांमध्ये अनेक मोठमोठे विकास कामे मार्गी लागले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी अनेक कामांसाठी निधी मिळवून सुद्धा मागील तीन वर्षापासून प्रशासनाने अनेक कामे रखडवली असून यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे तरी प्रलंबित सर्व कामे व विषय तातडीने मार्गी लावावे याकरता सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी नगरसेवक व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले.

 

 

 

 

 

संगमनेर नगरपालिके कडून विविध कामांच्या बाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक ,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकेस, किशोर पवार, नितीन अभंग, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्धाराम दीद्दी,योगेश जाजू, प्रमोद कडलग ,अफजल शेख, एकनाथ श्रीपाद, सौ प्रमिला अभंग, सौ शीतल भुसाळ, मिलिंद आवटी, हर्षल राहणे, मोहसीन शेख, अंबादास आडेप ,जीवन पांचारीया, रिजवान मंत्री, अमित गुंजाळ, निखिल पापडेजा,कमलेश उनवणे, गौरव डोंगरे, विशाल ढोले, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

या निवेदनात म्हटले आहे की स्वच्छ व सुंदर संगमनेर मध्ये सध्या कचरा व्यवस्थापन होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळून सुद्धा मागील तीन वर्षापासून प्रशासनाने अनेक रस्त्यांची कामे केलेली नाहीत. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अनेक गटारी तुंबले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील व उपनगरातील अनेक पथदिवे बंद आहेत. गुन्हेगारीच्या काही घटना घडत आहेत. शहर व उपनगरांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर घंटागाडी नेमून दिलेल्या वेळेस प्रभागात जात नसल्याने अनेक नागरिक रस्त्यांच्या कडेला कचरा टाकत आहेत .शहरात उपनगरात कचऱ्यासह मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले असून या सर्वांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी या सर्वांनी केली.

 

 

 

 

 

 

याप्रसंगी बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांकरता सातत्याने मोठा निधी मिळाला. शहरात अनेक कामे मार्गी लागली. सततच्या स्वच्छतेमुळे संगमनेर नगर परिषदेला राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. मात्र मागील तीन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. विकास कामांसाठी मोठा निधी मिळून सुद्धा कामे रखडवली आहेत. हे अत्यंत चुकीचे असून या सर्व प्रलंबित कामांसाठी सध्याचे सरकार व प्रशासन जबाबदार आहे. तरी नागरिकांच्या सुविधासाठी  तातडीने सर्व कामे सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.

 

 

 

 

 

 

यावेळी आदित्य बर्गे, अलोक बर्डे, विजय उदावंत, मच्छिंद्र दिघे, आदींसह शहर काँग्रेस व युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते . हे निवेदन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वीकारले असून पुढील आठ दिवसांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

 

 

 

 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या  निधीतून म्हाळुंगी  पुलाचे काम

 

 

 

संगमनेर शहरातील अनेक विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. म्हाळुंगी नदीवरील पूल फुल तातडीने व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवला. मात्र फक्त राजकारण करण्यासाठी प्रशासनाने थांबविले आणि आता सुद्धा हे काम संथ गतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून तातडीने हा पूल पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व शिष्टमंडळाने केली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *