{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी l झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या आश्वी बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे बबनराव शिंदे यांची निवड 

आश्वी बुद्रुक ही ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या गावच्या विकासासाठी युवक कार्यकर्ते विजय हिंगे यांच्या माध्यमातून सातत्याने काम होत आहे. गावातील विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी कायम भरीव निधी दिला आहे आणि त्यातून अनेक मोठमोठे विकास कामे उभी राहिली आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धतीमुळे थोरात गटाचे सरपंच नामदेव शिंदे व सर्व सदस्यांच्या पुढाकारातून घेत उपसरपंचपदी बबनराव शिंदे यांची निवड केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे,माजी उपसरपंच सौ अरुणाताई हिंगे, बाळासाहेब मदने, अजहरबाई शेख, अभिजीत ताजने ,अविनाश गायकवाड ,सौ दर्शना ताजने, परिघा गायकवाड, सौ केदारी जयश्री यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
 

यानंतर बबनराव शिंदे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अश्विमध्ये झालेली विकास कामे आणि सर्वांना सोबत घेण्याची पद्धत यामुळे ही जनता काँग्रेसच्या विचाराची असल्याचे ते म्हणाले.

बबनराव शिंदे यांच्या विजयासाठी युवक कार्यकर्ते विजय हिंगे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड ,राहुल जऱ्हाड, शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण होडगर ,किशोर पाटील जऱ्हाड ,योगेश पिलगर , युवा नेते संतोष ताजणे, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड ,माजी सरपंच महेश गायकवाड, पापा भाई शेख ,बाळासाहेब जऱ्हाड ,भाऊसाहेब गायकवाड, सिताराम होडगर,नामदेवराव मदने,  ब्रिज मोहन बिहानी, सोसायटीचे सर्व संचालक, रावसाहेब पंडित,  अण्णासाहेब काशिनाथ जऱ्हाड, सोमनाथ शेळके, अमरेश्वर मंडळाचे सर्व युवक कार्यकर्ते व ज्येष्ठ पदाधिकारी, बाबुराव काशिनाथ जराड, असलम भाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले

बबनराव शिंदे यांचे काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,डॉ.जयश्रीताई थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने जनतेची कामे करत आहोत . गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी मिळून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. कधीही दुजाभाव अथवा राजकारण केले नाही. सर्व समाजाला बरोबर घेतले. त्यामुळे आश्वी बुद्रुक गावातील सर्वसामान्य नागरिकांचा आमच्यावर मोठा विश्वास असल्याचे युवक कार्यकर्ते विजयराव हिंगे यांनी म्हटले आहे यापुढे ही किती संकटे आली तरी विकासाची घोडदौड चालू ठेवणार 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *