केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासु आठवले यांच्या उपस्थितीत 

 

 

 

 

 

नवी दिल्ली । झुंजार न्यूज

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लोकांकरिता विशेष आयोग कार्यरत असून त्यामधून मिळणाऱ्या सुविधाकरिता अडचणी निर्माण झाल्याने त्यातील असणाऱ्या अटी शिथिलता केल्यास युवकांना उदयोजक बनण्यास संधी मिळेल अशी निवेदनाद्रारे विराजश्री उदयोग समुहाचे चेअरमन युवा उदयोजक कल्पित वाकचौरे यांनी केंद्रीय ऊर्जा गृह निर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केली.
यावेळी केंद्रीय ऊर्जा गृहनिर्माण मंत्री खट्टर यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत भेट घेत विविध व्यापार निगडित मुद्द्यांवर चर्चा करण्यात येवून मागासवर्गीय युवकांना उद्योगांची संधी तयार करून देण्याकरता आपल्याद्वारे विशेष प्रयत्न करावेत असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात कल्पित वाकचौरे यांनी म्हटले की, मागासवर्गीयांसाठी अनेक उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध असून त्याकरिता भारत सरकार कटिबद्ध असून त्याकरिता आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील वर्गासाठी विशेष आयोग कार्यरत असताना त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांसाठी मागासवर्गीयांना अडचणी निर्माण झालेल्या असून त्यातील असणाऱ्या नियमांमध्ये शिथिलता आल्यास लाभार्थ्यांची संख्या वाढेल व नवीन मागासवर्गीय अनुसूचित जाती व जमाती युवा उद्योजक तयार होतील. 
दिलेल्या निवेदनाबाबत केंद्रीय ऊर्जा गृहनिर्माण मंत्री खट्टर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत सदरच्या धोरणानुसार त्यांच्या मंत्रालय अंतर्गत येणारे केंद्रीय psu कंपनीतील खरेदी संदरभातील ४% चा हिसा हा मागासवर्गीय उद्योगांसाठी आहे तरी त्यांचा लाभ घेण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे व  त्यात असणारे अडथळे व जाचक नियमांना शिथिल करावे जेणेकरून जास्तीत जास्त मागासवर्गीय उद्योजकांचा सहभाग वाढेल, यासंदर्भात केंद्रीय मंत्री  मनोहरलाल खट्टर यांनी मंत्रालयाचे सर्व अधिकाऱ्यांना बोलावून लवकरात लवकरच बैठक लावण्याचे आदेश दिले व मदतीचे आश्वासन दिले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *