{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["picsart"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

अकोले । झुंजार न्यूज

आंबेडकरी चळवळीची गाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्या चळवळीत ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानला गेला. मानवतेची भाषा अन् स्वाभिमानाचं जगणं यासाठी लागणारी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम आंबेडकरी चळवळीनं केलं. त्या चळवळ आकाशातील एक लखलखता तारा म्हणजे अकोले तालुक्यातील सुगांव बु॥ या डाव्या व दलित चळवळीच्या विचारधारेचे असणारे विजयराव वाकचौरे  हे होय .

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील  आंबेडकरी , दलित व रिपब्लिकन चळवळीला दिशा प्रदान करण्याचं मौलिक कार्य करणारे आदरणीय विजयराव वाकचौरे यांचा आज 65 वा वाढदिवसा… असून आजचं  माजी केद्रीय मंत्री , तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदराव पवार , स्व गोपीनाथ मुंडे यांचा ही जन्म म्हणजे 12 डिसेबर हा दिवस भाग्याचाचं म्हणावे लागेल .

रिपब्लिकन तथा संघर्षमय हृदय सम्राट ना रामदास आठवले यांचे सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वीकारले त्यांच्या विचारासरणी नुसार लोकशाहीचे सामाजिकरण चळवळीमधील अहमदनगर जिल्हयातून विजयराव वाकचौरे यांच्यासह  अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड हे दलित पँथर पासून आठवले यांचे खद्दे समर्थक बनले . मात्र आक्रमक व स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली . प्रशासकिय व सामाजिक क्षेत्रात एक दबदबा त्यांनी आपल्या स्वाभावातून निर्माण केला .

 

 

आयुष्यभर आंबेडकर चळवळ व आठवले यांच्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित आहेत . महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात एक पिंपळ पान असून त्यात विजयराव वाकचौरे या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अर्थात स्पष्ट वक्तेपणा, संघटक, कार्यकर्ता, प्रामाणिक आदी होय .

 
विजयराव कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाने समाज मनावर विशेष ठसा उमटविल्याने ” भाऊ ” म्हणून परिचित झाले . फुले-आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या म्हणून सातत्याने पन्नास वर्षापासून सामाजिकत्व व सामाजिक कटिबद्धता जपली . आंबेडकर चळवळीतील रामदास आठवलेसह भाई संगारे , राजा ढाले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, अविनाश महातेकर , राजा सरवदे , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड आदी सह राजकिय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार क्षेत्रातील मान्यवरांबरोबर त्यांचे स्नेही संबंध निर्माण झाले . तर अनेकांना राजकारणाची दिशा देत प्रोसाहित केले 

 

 

 

सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले भाऊ हे आंबेडकरी चळवळीतील एक ” स्टॉग मॅन “ ठरले आहेत. जागतिक पातळीवर ज्या चळवळीची नोंद झाली ती भारतातील ‘दलित पँथर चळवळ’ तसेच  ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ इत्यादि मध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील आक्रमक कार्यकर्ता हे कदापी विसरू शकणार नाहीत. आंबेडकर चळवळीसह समाजकारण व राजकारणात कठोरपणे कृतिशील भूमिका बजावत एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण त्यांनी केली आहे. 

आंबेडकरवादी प्रतिमा कायम राहावी म्हणून संघर्षशील पणे तळमळीने काम केले चळवळीशी तडजोड न करता आपली भूमिका ठाम ठेवली . त्याचा त्रास ही झाला, तर मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये भाग घेत आपल्या इराद्या पासून ते कधी ही विचलित झाले नाहीत. पँथर , रिपब्लिकनच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून देऊन अथक कार्य करण्याचा संकल्प पूर्ण करत सामाजिक व राजकिय क्षेत्रात अनेक चढ-उतार आले मात्र विचाराशी ठाम राहिले . अनेक राजकिय नेत्याशी जवळीक राहून ही त्यांनी आंबेडकर चळवळीशी व रिपब्लिकनशी फारकत घेतली नाही

 

 “आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” यासाठी आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. ही विचारधारा घेवून आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ बनले . विजयराव वाकचौरे एक माणूस म्हणून अंतर्बाह्य पारदर्शक आहेत. त्यांचा सहज सरळ स्वभाव, साधी राहणीमान व ध्येयवादी उच्च विचाराने सामाज्यात  खूप आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आज त्यांचा नाबाद 65 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेंच्छा देताना चळवळीच्या माध्यमातून काम करताना राजकिय क्षितिजावर जाण्याचे ध्येय व स्वप्न असल्याने त्यांनी केलेल्या ५० वर्षाच्या अखंड प्रवासातून स्वप्न पूर्ण व्हावे त्यांना होणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी ही खरी शुभेंच्छा ठरेल .

राजेंश गायकवाड

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *