{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

 

शिबलापूर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर  तालुक्यातील शिबलापूर येथील सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे यांनी ग्रामपचायतीच्या अंतर्गत कोव्हिड काळात आपल्या स्वतःच्या मालकीच्या मेडीकल मधून औषधे वापरून त्यांचे झालेले अनाधिकृत बील काढण्यात आल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी बोंद्रे यांचे सरपंच पदासह सदस्य पद रद्द केल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसल्याचे तालुक्यात एकच खळबळ उडाली असल्याने सगळीकडं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर अनेक सरपंच सुध्दा जागृत झाले आहे.

 

 

 

 

दिपक निवृत्ती रक्टे यांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीच्या सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या संरपचपदाच्या निवडणुकीत प्रमोद संतिष बोंद्रे हे निवडुन आले बोंद्रे यांनी ग्रामपंचायतीकडून आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्या सहीने ३०,३८४/- रु स्वतःच्या खात्यात वर्ग केले त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अपात्र करावे असा अर्ज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ग) व 16 प्रमाणे विवाद जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २९/११/२०२३ रोजी दाखल केला होता. त्यानुसार बोंद्रे यांना नोटीसा काढण्यात येवून त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यास संधी देण्यात येवून संगमनेर पचायत समितीच्या  गट विकास अधिकारी यांचेकडून सविस्तर अहवाल घेण्यात आला त्या नुसार दि 21/08/2024 रोजी दोघांचे ही लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आले

 

 

 

 

 

 

 

तक्रारदारांनी युक्तीवादात प्रमोद बोंद्रे यांनी कोव्हीड 19 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून साईराज मेडीकल मधून आरोग्य व शिक्षण लसीकरण करिता ३०,३८४ / – रूपयांचे साहित्य खरेदी केल्याचे नोंद आढळल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करावे अशी मागणी केली होती . त्या नुसार प्रमोद बौद्रे यांनी मेडिकल साहित्य पुरविलेल्या कामाचे ३०,३८४ स्विकारली असल्याचे पुराव्यानुसार दिसून येत असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 14 (1) (ग) व 16 मधील तरतूदीनुसार ग्रामपंचायत सदस्य तथा विदयमान सरपंच प्रमोद बोंद्रे यांना अपात्र ठरविणे उचित ठरेल. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला . तर तक्रारदारांच्या बाजूने ॲड स्वप्नील काकड यांनी काम बघितले . 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *