{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

परभणी या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधान प्रतीची समाजकंटकांकडून अवमान करण्यात आला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली.

 

 

 

 

10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी संविधान प्रतीची विटंबना करण्यात आली महापुरुषांच्या विटंबनाचे प्रकार या महाराष्ट्रात वारंवार घडत असल्याने शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी दोषींवर कडक शासन करावे कायद्याचा धाक या समाजकंटकानं बसल्याशिवाय महापुरुषांचा अवमान करण्याची हिम्मत यापुढे कोणी करणार नाही तसेच या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी कडक उपाययोजना शासनाने करावे परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा आम्ही जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार यांच्या आदेशाने तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेजाहीर निषेध करत असून यातील दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे

 

 

 

 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहराध्यक्ष प्रवीण कानवडे, युवक तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव ,विद्यार्थी तालुकाध्यक्ष गजानन भोसले, उपाध्यक्ष नितीन अहिरे, गौरव वाळे, प्रसाद काठे, दत्तात्रय मस्के ,मनीष माळवे ,अशोक काळे, अक्षय आव्हाड, मारुती सोनवणे आदी पदाधिकरी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *