आश्वी l झुंजार न्यूज
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान अवमान घटनेचा रिपाई ( आठवले ) पक्षातर्फे जाहीर निषेध करत संबंधितांना त्वरीत अटक करुन कठोर कारवाई करण्याची आश्वी पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्रारे मागणी करण्यात आली .

10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी संविधान प्रतीची विटंबना करण्यात आली महापुरुषांच्या विटंबनाचे प्रकार या महाराष्ट्रात वारंवार घडत असल्याने शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी दोषींवर कडक शासन करावे कायद्याचा धाक या समाजकंटकानं बसल्याशिवाय महापुरुषांचा अवमान करण्याची हिम्मत यापुढे कोणी करणार नाही तसेच या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी कडक उपाययोजना शासनाने करावे असे रिपाई संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके व युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे यांनी निवेदनाद्रारे केले .

यावेळी आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सोनवणे व साहाय्यक उपनिरिक्षक पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , तालुका सचिव नानासाहेब कदम , साहिल मुन्तोडे , अमोल मुन्तोंडे , गौरव मुन्तोडे , पत्रकार राजेश गायकवाड आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

लवकरचं तालुकास्तरिय रिपाई सह विविध संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेळके यांनी दिली .
Post Views: 1,022

