{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई l झुंजार न्यूज

 

 

 

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची शक्यता असून हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर या शपथविधी सोहळ्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला संधी मिळेल यांची उत्सूकता लागली आहे .

 

 

 

 

 

 

मिळाल्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला नागपुरात होण्यार असून यात महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचं त्यांच्या कोट्यातील एक जागा रिपाईला देणार का ? काही जागा रिक्त ठेवणार ? का अशी चर्चा आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादी आप – आपल्या कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरुन पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार हे पाहावे लागणार आहे. 

 

 

 

 

 

 

भाजपासह शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहे तर मंत्रिपद कायम राहावं, यासाठी वरिष्ठ नेते कसोशीनं प्रयत्न करत आहेत. 

 

 

 

 

कोण आहेत भाजपाचे संभाव्य मंत्री?

1) चंद्रशेखर बावनकुळे
2) सुधीर मुनगंटीवार
3) राधाकृष्ण विखे पाटील
4) गिरीष महाजन
5) चंद्रकांत पाटील
6) रवींद्र चव्हाण
7) संभाजी पाटील
8) अतुल सावे
9) परिणय फुके
10) संजय कुटे
11) पंकजा मुंडे
12) मेघना बोर्डीकर
13) रणधीर सावरकर
14) देवयानी फरांदे
15) माधुरी मिसाळ
16) चित्रा वाघ
17) विजयकुमार देशमुख
18) गोपीचंद पडळकर
19) राहुल कुल
20) योगेश सागर
21) जयकुमार रावल
22) शिवेंद्रराजे भोसले
23) नितेश राणे

 

 

 

 

शिवसेनेचे संभाव्य मंत्री
24) उदय सामंत 
25) शंभूराज देसाई
26) दादा भुसे
27) संजय शिरसाट
28) गुलाबराव पाटील
29) भरत गोगावले
30) प्रताप सरनाईक
31) अर्जुन खोतकर
32) विजय शिवतारे
33) राजेश क्षीरसागर
34) दीपक केसरकर
35) योगेश कदम

 

 

 

राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री
36) छगन भुजबळ
37) धनंजय मुंडे
38) आदिती तटकरे
39) संजय बनसोडे 
40) धर्मराव बाबा अत्राम
41) अनिल पाटील
42) नरहरी झिरवाळ
43) दत्तामामा भरणे
44) हसन मुश्रीफ
45) मकरंद पाटील
46) संग्राम जगताप 
47) इंद्रनिल नाईक
48) सना मलिक

 

 

 

 

शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

 

 

 

 

 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रीपदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रीपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणारा फॅार्मुला असणार आहे.  म्हणजेच, शिवसेनेला 10 मंत्रीपदे मिळत असतील तर या पाच वर्षांत 20 आमदारांना मंत्रीपदे मिळणार आहेत. 

तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची सुध्दा राज्यात चांगली कामगिरी राहिली त्यांच्या वाट्याला एक ही जागा देण्यात आली नव्हती मात्र एक मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले त्यानूसार रिपाईचा एक प्रतिनिधी शपथ होणार का ? घेणार असेल तर विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , गौतम सोनवणे , अविनाश महातेकर , राजा सरवदे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार अशी चर्चा होवू लागली आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *