आश्वी बु येथे दत्त जयंती सांगता प्रसंगी मार्गदर्शन

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

 

 

वास्तु शास्त्राचा उपयोग हा संपूर्ण मानव जातीच्या फायद्या साठी आहे. या वर अनेक अभ्यास करणारे विद्वान आहेत, यात दिशा मृदा परीक्षण वास्तु परीक्षण असे प्रकार येतात आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत ही फ्लॅट आणि बंगला पद्धती मध्ये हे शास्र लाभदायक ठरते व तसे अनेक अनुभव ही आहेत तसेच नियमांचे पालन करून मन्युषाने जर वास्तु राहणी मान ठेवले तर त्याला लाभदायक ठरते असे मत वास्तुशास्त्र तज्ञ आशिष खेडकर यांनी मांडले.

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यत्मिक व बालविकास केंद्र येथे दत्त जयंती सांगता प्रसंगी वास्तुशास्त्र तज्ञ आशिष खेडकर बोलत होते.पुढे बोलतांनी त्यांनी सांगितले की,वास्तुसास्त्रा मध्ये दहा दिशाना अत्यंत महत्व दिले गेले आहे.यामध्ये पूर्व दिशा ,पश्चिम दिशा,उत्तर दिशा,दक्षिण दिशा,आग्नेय दिशा,नैऋत्य दिशा,ईशान्य दिशा,वायव्य दिशा,ऊर्ध्व दिशा,अधर दिशा असून प्रत्येक दिशेचे अन्यन साधारण महत्व आहे. आग्नेय दिशाला किचन ओटा असने आवश्यक आहे. तसेच आग्नेय दिशेस कोणता ही खड्डा असु नये यामुळे शत्रुत्व वाढते पश्चिम वायव्या अथवा वायव्ये दिशेस टॉयलेट बाथरूम असने आश्यक आहे. नैऋत्य दिशेला घरातील करत्या पुरूषाती बेडरूम असावी.तर वायव्य कोपऱ्यात बैठक व्यवस्था असावी. उत्तरेच जर किचन,टॉयलेट अथवा बाय़रूम असल्यास आपल्याला आर्थीक कमी नेहमीच जाणवत राहील.

 

 

 

 

या राज मार्गत येण्यासाठी भाग्य असावे लागते त्यांच बरोबर स्वामी समर्थ सेवे करण्यासाठी भाग्य लागते तर स्वामी नी स्विकार करण्यासाठी आपले परम भाग्य असवे लागते.जर आपण मनोभावी श्री स्वामी समर्ताची सेवा केली तर आपले प्रारभ्द बदलण्याची ताकद ही स्वामी मध्ये असल्याचे आश्वी बु केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापक आप्पासाहेब शेळके यांनी सागितले.

 

 

 

 

 

 

यावेळी ज्येष्ठ सेवेकरी उपसरपंच बबनराव शिंदे, पोलिस निरीक्षक संजय सोनवणे,पोलिस उपनिरीक्षक दिपक बर्डे, पो हा शांताराम झोडगे, पो. हा. अशोक शिंदे प्राध्यापक आप्पासाहेब शेळके, दत्तात्रय पवार,नानासाहेब निघुते नामदेव ताजणे,नामदेव होडगर एकनाथ ताजणे, होडगर गुरूजी, सोमनाथ ताजणे सह महिला पुरूष सेवेकरी उपस्थित होते. दत्त जयंती निमित्ताने आयोजित सप्ताहाचे आयोजन अभिषेक ताजणे, मयुर वाडेकर, यशोदिप ताजणे, ऋतिक वाडेकर, तुषार ताजणे आदि केले होते.

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *