{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

आ अमोल खताळ यांनी रामनाथ गुरकुले
यांच्या कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन

 

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ आणि चंदनपुरीच्या सरहद्दीवरील शिरतार वस्तीवर राहणारे रामनाथ गुरुकुले या३४ वर्षीय तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या कुटुंबियांची आ अमोल खताळ यांनी भेट घेत सांत्वन करता या कुटुंबीयांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश वनविभागा च्या अधिकाऱ्यांना दिले

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जावळे वस्तीच्या शिवारातील ढुंगण्याच्या डोंगर परिसरातील जंगलात रामनाथ सुर्य भान गुरुकुले या तरुणाचा हिंस्त्र प्राण्या च्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दवी घटनेची माहिती समजतात संगमनेरचे आ अमोल खताळ यांनी सावरगाव तळच्या शिरतार वस्तीवर गुरुकुले यांच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट देत त्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला या तरुणाचा मृत्यू नेमका हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात झाला का त्याचा घातपात झाला याचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा असे आदेश आ.अमोल खताळ यांनी पोलिसांना दिले त्यावर त्या तरुणाचा मृत्यू हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात झाले असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णाल याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितले त्यावर वनविभागाची जी काही शासकीय मदत असेल ती शासकीय मदत लवकरात लवकर या कुटुंबीयांना देण्यात यावी असे आदेश आमदार खताळ यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिले

 

 

 

 

यावेळी आ खताळ यांच्या समवेत शिव सेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणेभाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे चंदनापुरीचे कामगार पोलीस पाटील ज्ञानदेव राहणे सावरगाव तळाचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे सावरगाव तळ ग्रामपंचायत माजी सदस्य दादाभाऊ शिरतार रोहिदास शिर तार चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहाणे श्याम राहाणे सामाजिक कार्यकर्ते शरद नेहे राम राहणे शिवाजी शिरतार, नंदू बो-हाडे साहेबराव बोऱ्हाडे,ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

 

 

संगमनेर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्या नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केलेला आहे त्यामुळे त्यावर सुद्धा लवकरच निर्णय होईल

 

 

आमदार अमोल खताळ 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *