आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे सुपुत्र रिपब्लिकन पक्षाचे ( गवई ) जिल्हाध्यक्ष तसेचं आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना हरेगाव ( श्रीरामपूर ) येथे स्वाभिमानी धम्म परिषदेतर्फे दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे , रिपब्लिकन पक्षाचे उत्तर राज्याध्यक्ष सुरेश देठे , दादू विष्णू यादव , साहेबराव यादव , दिलीपराव यादव , गौतम भालेराव , ॲड रमेश बनसोडे , विष्णू हरणामे , बाळासाहेब मोकळ , प्रदीप आढाव , बन्सी घंगाळे , सुनील संगारे , गोरख श्रीखंडे , दत्ता साळवे , राजू देठे , नानासाहेब पंडित संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाप्रमुख रामदास भालेराव , रावसाहेब पराड , श्रीरामपूर येथील नगरसेवक प्रकाश ढोकणे , सुनील वाघमारे , पप्पू पवार , संजय पवार , बाबासाहेब दिवे , पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब , सचिन अशोक शिंदे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुधाकर रोहम हे आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते असून त्यांचे वडील माजी आमदार दादासाहेब तथा पी जे रोहम हे डॉ आंबेडकरांचे कार्यकर्ते होते . 16 नोव्हेंबर 1939 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अहमदनगरला आले असता दादासाहेब रोहम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना हरेगाव येथे नेले होते हा इतिहास असल्यानेचं सुधाकर रोहम यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर आंबेडकरी चळवळ ही समाजामध्ये रुजविण्यासाठी मोठे योगदान रोहम यांनी दिले .

