{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंजार न्यूज 

बोटा येथे नुकताच भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहात हजारो भाविक आले होते. मात्र, यामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील हजेरी लावत तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पंगतीतील भाविकांना आमटी- भाकर वाढण्याचे काम देखील केले. यामुळे त्यांचा साधेपणा सर्वांनाच भावला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
संगमनेर तालुक्यातील बोटा येथे श्री संत जगद्‌गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर (३७५) अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त भव्य संगीत गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. संगमनेरसह, अकोले, जुन्नर या तिन्ही तालुक्यांतून हजारो भाविक कीर्तन, प्रवचन ऐकण्यासाठी येथे येत होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील या सप्ताहास भेट दिली
विशेष बाब म्हणजे तीन लाख रुपयांचा धनादेश देखील त्यांनी दिला आहे. यावरच न थांबता त्यांनी हातात बादली घेऊन जेवण्यासाठी बसलेल्या भाविकांना पंगतीत जाऊन वाढण्याचे काम केले.
यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ उपस्थित होते. परंतु, डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाढण्याचे काम केल्याने त्यांचा हा साधेपणा सर्वांनाच भावला. या सप्ताहात गावोगावचे लोक सहभागी होऊन हजारो भाकरी आणत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह पार पडला. या सप्ताहास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

विखे पाटील कुटुंबियांचे दातृत्व…
▶ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कोणतेही क्षेत्र असो तेथे नेहमीच विखे पाटील कुटुंबियांचे भरभरून योगदान असते. बोटा येथील सप्ताहाला देखील त्यांनी तीन लाख रुपयांची मदत केली असल्याने विखे पाटील कुटुंबियांच्या दातृत्वाची प्रचिती येते. याचबरोबर साधे राहणीमान आणि आपुलकीमुळे तरुणाई सेल्फी घेण्यासही गर्दी करताना दिसली आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *