सहकार महर्षी चषकात दुसऱ्याच दिवशी षटकारा चौकाराची आतिषबाजी

 

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात क्रीडा स्पर्धेत सर्वात मोठ्या व लौकिकास्पद ठरलेल्या सहकार महर्षी T -20 क्रिकेट स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी सिटी स्पोर्ट नाशिक संघाने 270 धावा करताना संगमनेरच्या संघावर मोठा विजय मिळवला. तर पठाण लायस नाशिकने 203 धावा करताना षटकारा चौकारांची आतिषबाजी केली.

 

 

 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट सामन्यात आज सुमारे 5000 प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये नाशिक विरुद्ध संगमनेर सह्याद्री आणि पठाण लायन्स नाशिक विरुद्ध अंजुमन स्पोर्ट्स क्लब संगमनेर यांच्यामध्ये लढती झाल्या.

 

 

 

 

20 षटकांच्या या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना सिटी स्पोर्ट नाशिक ने 8 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा केल्या. त्या बदल्यात सह्याद्री संगमनेर संघ 96 धावांवर बाद झाला यामध्ये नाशिकच्या निळकंठ तनपुरे ला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले त्याने नऊ षटकार व सहा चौकारांची आतिषबाजी करत 90 धावा फटकावल्या.

 

 

 

 

तर दुसऱ्या सामन्यामध्ये पठाण लायन्स नाशिक संघाने 10 गड्यांच्या मोबदल्या 203 धावा केल्या तर त्या प्रतिउत्तरात अंजुमन स्पोर्ट्स क्लब 100 धावांवर बाद झाला.

 

 

 

 

हे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठी गर्दी होती यावेळी ढोल ताशांचा गरज आणि प्रेक्षकांचा टाळांचा उत्साह यामुळे स्टेडियम दणाणून गेले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *