नेहरू चौकातील शेतकऱ्यांशी आ अमोल खताळ यांनी साधला संवाद

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

कष्टाने पिकविलेला शेतमाल विक्रीतून थोडेफार पैसे मिळत असतात परंतु नगर पालिका शेतकऱ्यांकडून सुद्धा कर वसूल करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडत नसण्याची तक्रार शेतकऱ्यांनी आ अमोल खताळ यांच्याकडे केली. शेतक ऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला नगरपालिके च्या करातून सूट देण्यासंदर्भात लवकरच मुख्याधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांना दिला

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील शेतकरी दररोज सकाळी नेहरू चौकात भाजीपाला आणि शेतमाल व्यापाऱ्यांना विकण्यासाठी येत असतात. या शेतकर्याच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आ अमोल खताळ यांनी शहरातील नेहरू चौकामध्ये गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला आणि त्यांच्या असणाऱ्या आडीअडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी कष्टाने आम्ही शेतकरी शेतमाल पिकवतो त्यासाठी लागणारी कीटकनाशके मजुरी यातून शेतकर्याच्या पदरी काहीच पडत नाही. शेतमाल विक्री केल्यानंतर काही थोडेफार पैसे शिल्लक राहतात त्यामध्ये नगरपालिका कररूपाने शेतकर्याकडून पैसे काढून घेत आहे. पालिकेच्या कराची पावती गेल्यानंतर शेतकऱ्यांकडे थोडेफार पैसे शिल्लक राहत असतात.त्यातच गाडी भाडे इंधन खर्च होत असतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याकडे थोडेफार पैसे शिल्लक राह तात त्यावरच त्याला त्याचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे.त्यामुळे शेतकर्यांच्या शेतमालास नगरपालिकेच्या करातून सूट देण्यात यावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी आ अमोल खताळ यांच्या कडे केली आहे., त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आ खताळ यांनी मुख्याधिका ऱ्यांच्या समवेत बैठक घेत योग्य तोनिर्णय घेतला जाईल असे शेतकऱ्यांना सांगितले

 

नगरपालिकेच्या करातून शेतकऱ्यांना सूट द्यावी-आ खताळ

 

 

मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या काय समस्या आहे हे मला माहित आहे. त्यात नगरपालिकेने कर आकारला तर शेतकऱ्याकडे काही शिल्लक राहत नाही त्यामुळे येथून पुढील काळात नगरपालिकेच्या करआकारणी ठेक्याची निविदा काढताना या करातून शेतकऱ्याला वगळावे असे आपण मुख्या धिकाऱ्यांना सुचित करणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed