राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या सूचना

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

खेड-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मंजूर झाला आह.हे काम करताना सर्व प्रथम ज्या शेतकर्याच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात जाणार आहे त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना विश्वासात घेत यावर मार्ग काढा .आणि रुंदीकरणाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा असे सक्त आदेश आ अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागा च्या धिकाऱ्यांना दिले

 

 

 

 

 

 

खेड- ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.या कामाचा आढावा घेण्यासाठी आ अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रशासकीय राष्ट्रीय महामार्ग प्राधि करण महसूल विभाग आणि वनविभाग या अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम व्यवस्थापक अंकित यादव, अभियंता दिलीप शिंदे तहसीलदार धीरज मांजरे, सहायक वनसंरक्षक संदीप पाटील,सार्व जनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्याम मिसाळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चंद्रकांत शिंदे, परिवहन आणि इतरही संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

खेड या राष्ट्रीय महामार्गावर ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.महामार्गाचे काम करतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कोणतीही काळजी घेतली गेली नसल्यामुळे या महा मार्गावर पडलेल्या खट्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला .तर काही जायबंदी झाले आहे. तसेच या महामार्गा वरील पथ दिवे, बस वे, सर्व्हिस रोड, वृक्षा रोपण, प्रदूषण आदी विषयांसह हिवरगाव पावसा टोल नाका कर्मचारी व प्रशासन यांच्याकडून तालुक्यांतील नागरिकांशी होणारा वाद, मारहाण या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका ऱ्यांना आ अमोल खताळ यांनी चांगलेच खडे बोल सुनावले

 

 

 

 

 

नव्याने रुंदीकरण होत असलेल्या महा मार्गाच्या टोल नाक्यावरती संगमनेरच्या स्थानिक नागरिकांना टोल सवलत देण्या बाबत, प्रशासनाकडून स्थानिक वाहन चालकांची अडवणूक केली जात आहे ती तात्काळ दूर करण्यात यावी.आणिनव्याने होत असणारा उड्डाणपूल, सिमेंट रस्त्याचे काम करताना प्रशासनाने काळजी घेतली गेली पाहिजे. सर्व्हिस रोडचे काम आणि पथदिवे बसवणे ही सर्व कामे गुणवत्ता पूर्ण, दर्जेदार, टिकावू, आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हायला हवेत असे निर्देश आमदार अमोल खताळे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले

 

 

 

खेड ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठीअंडरग्राउंड भुयारीमार्ग तसेच दोन्ही बाजूने वृक्ष लाग वड सुद्धा केली जाणार आहे. महामार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचे अपघात टाळ ण्यासाठी वन्यजीव प्राणी संस्था डेहराडून यांनी केलेल्या सूचनेनुसार राष्ट्रीय महा मार्ग प्राधिकरण विभाग त्यांच्या सूचनांचे पालन करून खबरदारी घेणार आहे. महा मार्गावर असणारे बस थांबे, शालेय विद्या र्थ्यांसाठी पासेस सुविधा यावर सुद्धा या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच महामार्गात जणारी सर्व जागा भूसंपादन कायदा १९५६ नुसार संपादित करण्यात आलेली आहे जर शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या महसूल प्रशासन सोडवेल

 

श्री संजय कदम
प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग पुणे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *