Oplus_131072

 

आमदार अमोल खताळ यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

संगमनेर शहराच्या जवळ असणाऱ्या घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्याकडे केली आहे

 

 

संगमनेर विधानसभा मतदारसंघात सामान्य गोर – गरीब नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागतआहे संगमनेर शहराजवळच घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे.या ग्रामीण रुग्णा लयामध्ये अनेक आरोग्यविषयक सेवा सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळत नाही.

 

 

 

 

 

 

त्यामुळे आपल्या स्तरावरून या ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्यविषयक सर्वोत्तम दर्जाची वैद्यकीय यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करून द्यावी.तसेच त्या वैद्यकीय सेवा सुविधा संगमनेर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आ अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री. प्रकाश आबिटकर यांचीभेट घेऊन केली आहे .

 

 

 

 

 

संगमनेर नगरपालिकेच्या आवारात असणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रूपांतर स्त्री रुग्णालया मध्ये करावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *