आश्वी । झुंजार न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत व स. ब. वि. प्र. समाज संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४-२०२५” चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे गुरुवार, दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मौजे शिबलापूर येथे या शिबिराचा समारोप समारंभ पार पडला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आणि पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ सर यांनी केले, तर शिबिर काळात केलेल्या कामाचा अहवालाचे वाचन एनएसएस शिबिराचे कार्यक्रम आधिकारी प्रा.डॉ. राजेश मंजूळ यांनी केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करताना म्हणाले की , . सध्याचा विद्यार्थी हा भविष्याचा नागरिक असून, त्याला श्रमसंस्कार आणि दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते असते

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ. संजय सांगळे, सह सेक्रेटरी श्री दत्तात्रय चासकर , रजिस्ट्रार मा.बाबुराव गवांदे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. गोरक्ष हासे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व प्रा नानासाहेब दिघे यांनी सूत्रसंचलन केले.

या प्रसंगी बापूसाहेब पाबळ, रावसाहेब नागरे, चेतन म्हस्के, भाऊसाहेब नागरे, बाळासाहेब मन्तोडे, महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. विलास कोल्हे , नॅक समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट , कार्यालयीन अधीक्षक गोरक्ष पानसरे , डॉ.त्रिंबक राजदेव , डॉ. पी एम गायकवाड , सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शेख , प्रो. डॉ. बैरागी , प्रा. गणेश थोरात, डॉ. जोरवर , डॉ. खैरे , प्रो. डॉ. श्रीमती बोऱ्हाडे , श्रीमती डॉ. कदम , प्रा. नानासाहेब गुंजाळ , प्रा. महेश हजारे , श्रीमती प्रा. महाले , प्रा. स्नेहलता थिटमे, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. साबळे , महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
