आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डाॅ.बाळासाहेब विखे पा. (पद्मभुषन उपाधिने सन्मानीत) प्रवरा इंग्लिश मेडीयम स्कुल येथे संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शाळा समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब भोसले पा. यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह संम्मेल्लन उत्साहात संपन्न झाले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सयराम शेळके यांनी केले . त्यानंतर पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पा. व पद्मभुषन डाॅ. बाळासाहेब विखे पा.यांच्या प्रतिमेचे पुजन केले. सौ . सरोदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन स्नेहसम्मेलनास शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथींच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विवीध उपक्रमांमधे प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आली, विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला यात विवीध राज्यावर आधारीत नृत्यकला सादर केल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक गुलाबराव सांगळे पा., साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर दिनकरराव गायकवाड स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब भोसले पाटील श्री एकनाथराव वर्पे साहेब,डाॅ.दिनकरराव गायकवाड पा. ,कनिष्ठ महाविद्यालाचे शंकरराव गाडेकर सर , बाळकृष्ण शिंदे , सौ.शोभा ताजणे आदि शिक्षक शिक्षकेत्तर उपस्थित होते , या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपासना म्हसे मॅडम यांनी केले तर आभार वनिता तांबे मॅडम यांनी केले.

