{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी कोकरे यांना निवेदन देत दिला इशारा

 

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

 

संगमनेर नगरपालिका हद्दीतील अनधिकृत निवासी बांधकामांना लावण्यात येणारा शास्ती कर माफ करण्यात यावा व चालू आर्थिक वर्षात कुठलाही दंड म्हणून कर वसूल करू नये अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले.

 

 

 

 

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर नगरपालिका हद्दीतील अनाधिकृत असणाऱ्या निवासी बांधकामांना बेकायदेशीरपणे लावण्यात येणारा शास्ती कर १००% माफ करावा. संगमनेर नगरपालिका मागील कित्येक वर्षापासून संगमनेर शहरातील अनधिकृत बांधकामांना प्रतिमाह २% असा शास्ती कर गेल्या कित्येक वर्षापासून लावण्यात येतो. यासंदर्भात नगरपालिका व शासनाला यापूर्वी अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निवेदन देऊन शास्ती कर रद्द करण्याबाबत मागणी केली होती, परंतु संगमनेर नगरपालिका प्रशासन या संदर्भात वेळ काढून पणा करत आहे . याचा त्रास शहरातील गोरगरीब नागरिकांना बसत आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील अनधिकृत असणारे निवासी बांधकामांना शास्तीकर माफ करण्यात यावा. यापूर्वी शासनाने ८ मार्च २०१९ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत निवासी बांधकामांना शास्ती कर माफ केला आहे. त्याच आधारे संगमनेर नगरपालिकेने देखील निवासी बांधकामांचा शास्ती कर १००% माफ करावा तसेच निवासी अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी वश अल्प प्रमाणात दंड आकारून नियमित करण्याचा विचार करावा अशी मागणी आमच्या पक्ष संघटनेच्या वतीने करत आहोत. आपल्या स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत शास्ती कर वसूल करू नये अन्यथा दि.२० फेब्रुवारी २०२५ पासून मुख्याधिकारी संगमनेर नगरपरिषद यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल यातून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी आपल्या विभागाची असेल असे निवेदनात म्हटले आहे.

 

 

 

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रविण कानवडे, युवक तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव , महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई राऊत, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन भोसले, जिल्हा सरचिटणीस मनीष माळवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळे, अनिल कोळपकर , भाऊराव देशमुख, संदेश आवारी, अभिषेक तांबे, प्रतीक गाडेकर, कुणाल जाधव, भास्कर मोहिते, नितीन अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed