लाभार्थींनी आधार, मोबाईल नंबर व बँक खाते तहसिल कार्यालयात जमा करावे

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची, या योजने करीता उघडण्यात आलेली बँक खाती हि प्रत्येक लाभार्थ्याच्या आधार व मोबाईल नंबरशी संलग्न असणे गरजेचे आहे.त्या साठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले आधार, मोबाईल नंबर आणि बँक खाते तहसिल कार्यालयात तात्काळ जमा करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे

 

 

 

 

विशेष सहाय्य कार्यक्रमातंर्गत राबवि ण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनामधील वयोवृद्ध, आजारी, दिव्यांग व विधवा महिला अशा पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय तहसिल कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते. मात्र आता या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थ सहायाचे वितरण जलदगतीने करण्या साठी तसेच नागरिकांना मिळणा-या सेवा जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलीत कामकाज पध्दतीचे पुनर्विलोकन करुन प्रशासकीय कार्यपध्दतीत सेवा अतिशय सुलभ पध्दतीने देवून नागरिकांचे जीवन सुकर व्हावे या करीता शासनाच्या मार्फत योजनांचा लाभ डी बी टी पोर्टलच्या व्दारे करण्याबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजने तील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण माहे डिसेंबर २०२४ पासून डी.बी.टीव्दारे करण्यात आले आहे. हे अनुदान चालु महिन्यात थेट हस्तातरण योजनेव्दारे सर्व लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे

 

 

 

 

ज्यांचे बँक खाती आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी संलग्न असणाऱ्या या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्राप्त होणारा लाभ हे फेब्रुवारी 2025 नंतर बंद होणार आहे.तरी या योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी या योजनेकरीता उघड ण्यात आलेले बँक खाते आधार क्रमांक व मोबाईल नंबरशी जोडण्यासाठी तहसिल कार्यायल येथे संपर्क साधावा असेही आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed