डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बापाचा संघर्ष फेल ठरला !

बुलढाणा । झुंजार न्यूज

 

 

 

“तब्बल एक महिना दिलेली झुंज अखेर हरली ! निमित्त होते सायकलवरुन खेळता खेळता पडली व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ६ वर्षिय सुजाताची प्राण ज्योत मावळल्याने महीनाभर अन्न पाण्याविना संघर्ष करणाऱ्या पैशा घालूनही असाह्य बापाची प्रयत्न फेल ठरले ! 

 

बुलडाणा जिल्ह्यातील धाड तालुक्यातील कर्डी या गावातील सहा वर्षिय सुजाता मंगेश थोरात ही सायकलवर खेळ असताना पडली . पडल्यानंतर खाजगी डॉक्टराकडे उपचाराकरिता नेले असता तिच्यावर किरकोळ पणाचा उपचार झाला त्यानंतर १० – १२ दिवस मुलगी चांगली खेळल . अचानक सुजाताची तब्बेत बिघडली तिला बुलढाणा येथील . एका खाजगी हॉस्पीटल येथे उपचाराकरिता नेले असता तेथील डॉक्टरांनी संभाजीनगर येथील कमलनयना बजाज हॉस्पीटलला जाण्याचा सल्ला दिला . 

 

 

आपल्या मुलीचा जीव वाचविण्याकरिता मुलीच्या आई – बापाने मुलीला कमलनयना बजाज हॉस्पीटल मध्ये नेले . तेथे डॉ निखिल पाठक यांच्या नेतृत्वाखाली मुलीवर उपचार सुरु झाले . उपचारदरम्यान होणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चावर वडीलांनी गरिबी झार आणून न देता गरिबी परिस्थिती मात करत मुलीच्या उपचारावर कमतरता येवून दिली नाही . पहिल्या तीन – चार दिवस मुलीनीही उपचारादरम्यान योग्य पध्दतीने प्रतिसाद दिला . मुलगी बोलू लागली आई – बापाकडे विविध प्रकारे खाण्यास मागू लागली ‘ ऐ देणागं माय ‘ मला काही तरी खायला ‘ , अशी म्हणू लागली मुलीची तबेत सुधारल्याचे दिसू लागल्याने डॉक्टरांनी पैशाकरिता तगादा लावला मुलीच्या बापाने सुध्दा मागचा पुढचा विचार न करता आपल्याकडील सर्व जमापुंजी खर्च केली . पण मात्र उपचार करणारे डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले १० – १२ दिवस डॉक्टरचं गायब दिसले त्यामुळे उपचार थंडावला . डॉक्टरांच्या परतीनंतर डॉक्टरांनी पुन्हा पैशांची मागणी केली .

 

 

पैशाची कमतरता झाल्याने राज्यातील रुग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार म्हणीनुसार मुलीच्या बापाने आमदाराच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांचे पत्र घेतले व आमदाराला फोन लावण्यास सांगितले यांचा राग धरुन उपचार करणारे डॉक्टरांनी पेशेंटला इतरत्र ठिकाणी हलविण्यास सांगून उपचार थांबविला . मात्र बापाने हात – पाया जोडून डॉक्टरांची विनवणी केली अर्वाच्च भाषेत बोलत डॉक्टरांनी पैसे भरल्यानंतरचं उपचार सुरु होईल असे ठणकावले . नातेवाईक व मित्र परिवारांनी काही पैशांची जमावा – जमव केली .

 

 

एकीकडे संपूर्ण देश प्रजासत्ताकदिन साजरा करत असताना ६ वर्षिय सुजाताची अचानक तबेत बिघडली . डॉक्टरांनी मुलीला तातडीने दुसरीकडे घेवून जा ! असा सल्ला दिला हतबल बापाने इतरत्र हॉस्पीटलशी संपर्क सुरु केला मात्र मुलीची परिस्थिती बघून कोणीही जबाबदारी घेण्यास तयार होत नव्हते . अचानक रात्री आठ वाजता डॉक्टरांनी सांगितले की , पेशेंटला के एम हॉस्पीटलला घेवून जा मी फोन केला आहे . . . असाह्य बापाने पुढचा मागचा विचार न करता मुंबईला जाण्याची मनाची तयारी करत मुंबईकडे रवाना झाले .

 

 

२१ हजार ऐम्बुलेंसला भाडे देत संपूर्ण रात्र पेशेंटला घेवू फिरावे लागल्याचे चित्र दिसले अखेर शेवटी ठाणे येथील अपेक्षा हॉस्टीपलमध्ये ॲडमिट केले . 26 तासात असाहय बापाने उपाशी राहून आपली मुली कशी बरी होईल याकरिता झगडला नातेवाईकामार्फत प्रत्येकांकडे मदतीची याचना केली . मुख्यमंत्र्यांना सुध्दा फोन केले मात्र उपयोग झाला नाही अखेर मंगळवारी सुजाताची प्राणज्योत मावळली .

बजाज हॉस्पीटल मधील उपचार करणारे डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणा व दर्लक्षपणामुळे माझी मुलगी दगावली ६ लाख रुपये घेवूनसुध्दा असभ्य भाषेत डॉक्टर बोल असतानासुध्दा मुलीकरिता गप्प राहिलो या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणी पिडीत बापांनी केली आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *