संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द सह नेवासे तालुक्यात तिन ठिकाणी शिवभक्त बालब्रम्हचारी पुंजाआईंचे तिन मंदिरे असुन आज त्यांची ३० वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त विशेष लेख

 

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज संजय गायकवाड 

 

 

विज्ञानाचा प्रसार वाढू लागला तसतसा लोकांचा धर्मावरचा विश्वास ढळत चाललाय पण अशा ढळत्या विश्वासाला सावरण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा धर्मावरचा विश्वास अधिक दुढ करण्यात काही प्रभुती आपले आयुष्य खर्चि घालतात अन् ते ज्यावेळेस आपल्या कार्यात यशस्वी होतात तेव्हाच या जगाचा निरोप घेतात अशा प्रभुतीमध्ये आश्वीच्या शिवभक्त पुंजाआईचा उल्लेख करावा लागेल

 

 

 

 

 

 

पुंजाआईनां इहलोकातुन परलोकात जाण्याला ३० वर्ष पुर्ण झाली पण कुठल्याही गावकऱ्याला त्या आपल्यातुन गेल्या असे वाटत नाही. पुंजाआईचा जन्म पुणतगाव ता. नेवासा येथील ठकुबाई व सखाराम कहार यांच्या पोटी झाला पुंजाबाई च्या जन्म पुर्वी म्हणजे त्या आपल्या आईच्या पोटात असताना प्रवरानदीस पुर आला असताना त्यांच्या घराला पुराने वेढा दिला ठकुबाईस तेव्हां ७ वा महीना सुरु होता पुराचे पाणी त्यांच्या पोटास लागले असता रात्रीतुन पुर ओसारला. देवगड चे किसनगिरी महाराज व पुंजाआई चे नाते भाऊ बहीनीचे घरची परिस्थिती अत्यांत हलाखीची असल्याने पुंजाआईच्या घरच्यांनी पुंजाआई च्या विवाहाचा विष़य घरात मांडला मात्र विवाहास विरोध करुन घर सोडले व थेट आश्वी खुर्द गाठले गावात येतात शिवआराधनेला सुरुवात केली त्यांनतर कोपरगावच्या नदीकीनारी शिवमंदीरात तब्बल १२ वर्ष तप केले या काळात पुंजाआई च्या आसपास अनेक विषारी साप इंचु व इतर जगंली प्राणी वावरत होते मात्र या प्राण्यानीं साधा डकं ही केला नाही.

 

 

 

 

 

त्यांनंतर पुन्हा आश्वी खुर्द येथे येवुन भैय्याबाबांचा अनुग्रह घेऊन गावात धार्मिक प्रवाहा सुरु केला पुंजाआईचा जन्म जरी पुनतगाव असला तरी कर्मभुमी आश्वी खुर्द च राहीले पुंजाआईने गावात आल्यापासुन आपल्या शिव उपासनेला सुरुवात केली त्यांनी त्यातुन लोकांना धार्मिकतेचा संदेश देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या दैवी शक्तीचे अनेक चमत्कार लोंकाना वेळोवेळी दाखवुन दिले. त्याच्यांकडे कोणताही माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत तो कधीही नाराज व मोकळा परतत नसे. पुंजाआई त्यानां काही धन दौलत देत नसत पन आपल्या दैवी वाणीने त्यांच्याशी त्यांच्याच संसाराच्या गप्पा करुन त्यांना उपदेश करुन जात ते त्याला बसल्या ठिकाणी कळत नसे पन तो जेव्हां दर्शन घेऊन बाहेर पडे तेव्हा त्याच्या ध्यानात पुंजाआईचे बोल येत पुंजाआईच्या उपदेशाचा जसा लोक आपल्या जीवनक्रमणासाठी वापर करत तसंच त्यांची उदी म्हणजे निमसंजीवनी असत. कितीही माणूस आजारी असोत त्याने जर पुंजाआईची उदी आपल्या भाळी लावली तर आपल्या आजारापासुन मुक्तता मिळवीत. लहान मुलाना देखील पुंजाआई उदीचाच प्रसाद देत त्यामुळे गावात कुणीही आजारी पडत नव्हते

 

 

 

 

अशा या पुंजाआईनेपन कधी या श्रध्देला अंधश्रध्देत रुपांतरीत होऊ दिले नाही गावाला त्यांनी भरभरुन दिले व त्यांच्याच अट्टाहासाने गावात महादेव, मारुती, खंडोबाच्या मंदीराचा जिर्णाध्दार झाला पुंजाआईस जसा आश्वी परिसर मानत तसेच देवगडाचे मठाधीपती भास्करगिरी महाराज आई मानत अशा या पुंजाआईने देवगड क्षेत्रीच मानवी देहाचा त्याग केला आज पुंजाआई चे आश्वी खुर्द , श्रीक्षेत्र देवगड जवळील बकुपिंपळगावात प्रवरासंगम तसेच जन्मभुमि पुनतगाव येथे भव्य असे मंदीरे आहेत पुंजाआईं ची पुण्यतिथी वरिल चार ही ठिकाणी मोठया भक्तीभावाने श्रधेने साजरी करतात व या कार्यक्रमाचे वैशिष्टये म्हणजे आमटीभाकरीचा महाप्रसाद.

 

 

 

 

 

शेवटी एवढेच म्हनावेसे वाटते , झाले बहू होतील बहु। पर या सम याच॥

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *