Oplus_131072

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

विदयार्थी दशेपासून आंबेडकरी व पँथर चळवळीत स्वतः झुकून देवून अहोरात्र समाज्याच्या माणसाला न्याय देण्याचे काम करणारे तथा रिपब्लिकन पक्षाचे एकनिष्ठ व जेष्ठ नेते श्रीकांत तबाजी भालेराव यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा येथे केंद्रीय मंत्री ना . रामदासजी आठवले , राज्याचे जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे व कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि . 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता  ” अमृत महोत्सव ” सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती  स्वागताध्यक्ष सुरेंद्र थोरात , सुनिल साळवे व आशिष शेळके यांनी दिले

रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव हे वयाचे 75 वर्षे पूर्ण करत 76 वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने  जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविले . श्रीकांत भालेराव यांनी विदयार्थी दशेपासून सामाजिक चळवळीला सुरुवात करत आंबेडकरी व पँथर चळवळीत हिरारीने सहभाग घेत नामातंर , मंडेल आयोग , मुंबई झोपडपट्टी , आरक्षण आदीसह विविध आंदोलने मोर्चात अग्रही राहून सामाज्यातील लोकांना न्याय व सन्मान मिळवून दिला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्विकारत रिपब्लिकन पक्षाला बळकटी मिळवून देण्याचे काम केले सहकार सम्राटाच्या अहिल्यानगर जिल्हयात अत्यंत धूर्तपणे पक्ष वाढवून तरुणांसह महिला व जेष्ठांची मुठ बांधली . अशा कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचे अमृत महोत्सव साजरा होत आहे . 

यावेळी जेष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील ,  माजी आमदार डॉ सुधीर तांबे , आमदार अमोल खताळ पाटील , आमदार सत्यजित तांबे , नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनवणे , वंचित बहुजनचे राज्य प्रवक्ता उत्कर्षाताई रुपवते , शिवसेना ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड , श्रीमती आशाताई लाडंगे ,  ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहोम , रिपाई राज्य सचिव दीपक गायकवाड , डॉ अशोकराव इथापे , जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर , ॲड श्रीराम गणपुले , मुंबई प्रदेश सचिव सुनिल मोरे , भिमाजी बागुल , सुभाष त्रिभुवन , पप्पू बनसोडे , जेष्ठ नेते रावसाहेब बनसोडे , रमेश शिरकांडे , माणिकराव यादव , अकुंश भैलुमें , लॉरेन्स स्वामी , अजय साळवे , अमित काळे ‘ ॲड किरण रोहोम , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सिमाताई बोरुडे , रमाताई धिवर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहे

तरी जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष सुरेंद्र थोरात , सुनिल साळवे , आशिष शेळके , कैलास कासार ,  योगेश मुन्तोंडे , विजय खरात , रूपालीताई सोनवणे, मधुकर सोनवणे आदीनी केले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed