{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असतो. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोर्वे गावातील युवकांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. 

        

 

 

Oplus_131072

 

अहिल्यानगर ,पुणे, नासिक,  तसेच छ. संभाजी नगर या जिल्यातील सुमारे 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अतिशय उत्कृष्ट नियोजनात झालेल्या या रोमहर्षक सामन्यांत टाकळी भान संघाने प्रथम क्रमांक  मिळविला तर सोनई येथील संघाने द्वितीय क्रमांक, संगमनेर येथील रूद्र संघाने  तृतीय क्रमांक, तर जोर्वे येथील संघाने, “उत्कृष्ट संघ” म्हणून पारितोषिक मिळविले. शेकडो प्रेक्षकांसह सर्वांच्याच स्मरणात राहाव्या अशा प्रकारच्या या स्पर्धा झाल्या. यावेळी  ज्येष्ठांना सोबत घेत, जोर्वे गावातील शेकडो  युवकांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, 

           

 

Oplus_131072

 

 

 

यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या कि,  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विकसित संगमनेर तालुक्याचे पाहिलेले स्वप्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. 1985 पासून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता दूरदृष्टीतून त्यांनी काम केले 1989 मध्ये हक्काचे पाणी मिळून पाईपलाईनचे जाळे निर्माण केले. त्यानंतर सरकार आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला जालना दिली. 

           

 

 

 

Oplus_131072

 

 संगमनेर मध्ये मोठमोठ्या पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केल्या. निळवंडे धरण व कालव्यांसारखे ऐतिहासिक काम पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले. सुसंस्कृत आणि वैभवशाली तालुका बनवण्यात लोकनेते बाळासाहेब थोरात यांची दूरदृष्टी असून संगमनेर तालुक्याचे नाव देशपातळीवर नेणाऱ्या या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्तुत्वाने राज्यभर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण केला आहे. तरी सर्वांनी विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभे रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *