शिर्डी । झुंजार न्यूज
सर्व धर्म संभवाचे प्रतीक असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत महाराष्ट्र धोबी परिट सेवा संघाचे १२ वे महाअधिवेशन रविवार दि . ९ मार्च २०२५ रोजी पार पडत असून या अधिवेशनाला राज्यातील ३६ जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार समाज बांधब उपस्तित राहणार असल्याची माहिती राज्याचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

दरम्यान महाराष्ट्र धोबी परीट सेवा संघाचे १२ वे महाअधिवेशन श्री साईबाबाच्या शिर्डी नगरीत पार पडत असून या अधिवेशनाला राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आ छगन भुजबळ, माजी खा.डॉ सुजय विखे पाटील तसेच खा भाऊसाहेब वाकचौरे, खा.निलेश लंके आदींसह जिल्यातील सर्व आमदार आणि धोबी परिट सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

या महाअधिवेशनात प्रामुख्याने गेल्या ६४ वर्षांपासून प्रलंबित असलेला एस.सी प्रवर्गात समावेश करण्यात यावा हि मागणी असणार आहे.१९६० पूर्वी हा समाज एस सी प्रवर्गात होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंत चव्हाण यांनी एस.सी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गात समावेश केला.देशातील १८ राज्यात आमच्या समजला एस.सी प्रवर्गात समावेश असल्याचे सांगत याप्रमाणे आम्हाला एस.सी प्रवर्गात मध्ये समाविष्ट करावा अशी एकमुखी मागणी केली असून आम्हला न्याय न मिलाळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी राष्ट्र संत गाडगे महाराज यांना भारत रत्न देण्यात यावा अशीही मागणी करण्यात येणार आहे.तसेच लॉंड्री व्यवसायासाठी मागेल त्याला सोलर देण्यात यावे.स्वतंत्र राष्ट्र संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.

यावेळी अधिवेशनात वधू वर परिचय,सामुदायिक विवाह सोहळा,युवकांसाठी क्षक्षणिक व्यावसायिक प्रशिक्षण आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खैरनार यांनी म्हटले.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष खंडेराव कडलग,समन्वयक गोविंद राऊत,कार्यक्रमाचे निमंत्रक ताठ जिल्हाध्यक्ष सुनील फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
