71 पुस्तकांचे अभिवाचन


छंदाबरोबर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत चालली असून वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याकरता निवृत्त नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी दर्जेदार विविध 71 पुस्तकांचे अभिवाचन केले असून यातून वाचन चळवळीला नक्की प्रोत्साहन मिळत असून नव्या काळाबरोबर तरुणांना पुस्तके ऐकायला मिळत आहेत.

 

 

 

Oplus_131072

 

संगमनेर तहसील कार्यालयातून 2012 मध्ये नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाल्यानंतर अनिल सोमणी यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात सेवा सुरू केली. याचबरोबर आपला वाचनाचा व्यासंग जपताना साहित्य व नाट्य परिषदेमध्ये ही त्यांनी योगदान दिले.

 

 

 

Oplus_131072

 

कोरोना संकटकाळात सर्व जग बंद पडले होते. अशा काळामध्ये त्यांनी पुन्हा वाचन सुरू केले याचबरोबर या पुस्तकांचे अभिवाचन व्हावे याकरता त्यांनी घरी सर्व यंत्रणा तयार करून 71 पुस्तकांचे वाचन केले. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोग, डॉ अनिल सहस्रबुद्धे यांचे मना शपथ खरे सांगेन या पुस्तकाचे रेडिओवरही वाचन झाले. श्यामची आई ,गौरव गाभारा, प्रवास स्वररत्नांचा, चंदनाचे हात, हरिश्चंद्रगड ,भंडारदरा परिसर विशेषांक, काळ आला होता पण, त्र्यंबकजी डेंगळे यांचा विविध पुस्तकांचे अभिवाचन त्यांनी केले आहे. याचबरोबर विविध पुस्तकांचे परीक्षण सूत्रसंचालन अभिवाचन सांस्कृतिक कार्य कार्यक्रमाचे परीक्षण यांसह नाट्यकर्मी संस्थेसह विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत आहेत.

 

 

Oplus_131072

 

 

श्यामची आई या पुस्तकाचे अभिवाचन विद्यार्थ्यांमध्ये जास्त लोकप्रिय झाले, राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यासाठी शिक्षक संघाचे शांताराम डोंगरे यांनी विशेष पुढाकार घेतला असून कवी इंद्रजीत भालेराव ,कवी बाबासाहेब सौदागर, सौ दुर्गाताई तांबे यांच्या कवितांचे वाचनही त्यांनी केले आहे.

 

 

 

 

याबाबत अनिल सोमणी म्हणाले की, वाचन हे अत्यंत गरजेचे आहे सध्याची पिढी ही सोशल मीडियावर जास्त असते परंतु सोशल मीडियाचे ज्ञान हे जीवनासाठी पूर्ण काळ माहिती देणारे ठरत नाही. तीन तासांचा चित्रपट 30 सेकंदाच्या रीलवर आला आहे मात्र यातून ज्ञानार्जन होणार नाही नव्या पिढीने वाचन केलेच पाहिजे. आणि याकरता ज्येष्ठांनी वाचन चळवळ अधिक समृद्ध होण्याकरता विविध उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. पुस्तके हे माणसाला शहाणी बनवत असून सध्या तरुणांना पुस्तकांची गरज आहे. यापुढील काळातही राष्ट्रपुरुषांवरील अनेक पुस्तकांचे अभिवाचन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

अनिल सोमणी यांचे अभिवाचन हे वाचन चळवळ समृद्ध करणारी असल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात,इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.नितीन भांड,प्रा.बाबा खरात, रामदास तांबडे, मुख्याध्यापक संघाचे शांताराम डोंगरे, अनिल देशपांडे, अरविंद गाडेकर, डॉ सोमनाथ मुटकुळे यांच्यासह संगमनेर साहित्य परिषद व विविध साहित्य प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *