{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

दररोज 80 हजार लिटर इथेनॉल निर्मिती व  ताशी 1800 युनिट वीज निर्मिती होणार

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे.अत्यंत पारदर्शीपणे, व काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून या कारखान्याने नेहमीच देशातील सहकारासाठी दिशादर्शक काम केले आहे. नव्याने विस्तारित इथेनॉल प्रकल्पातून दररोज 80 हजार लिटर इथेनॉल निर्मिती व बॉयलर वाफेवर 1.80 मेगा वॅट क्षमतेचा टरबाइन चालू ताशी 1800 युनिट वीज निर्मिती होणार असून यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार मोठा लागणार आहे.

 

 

Oplus_131072

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित आसावणी प्रकल्प व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते झाला.यावेळी मा.आ डॉ.सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे ,सुधाकर जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, शंकरराव खेमनर, आर.बी .रहाणे , लहान भाऊ गुंजाळ, इंद्रजीत भाऊ थोरात, व्हाईस चेअरमन संतोष असे,लक्ष्मणराव कुटे, मधुकरराव नवले, सुरेश गडाख, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते .

 

 

Oplus_131072

 

या प्रसंगी सन 2024-25 या गणित हंगामातील 8 लाख 777 साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

 

 

Oplus_131072

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सहकारासाठी दिशादर्शक काम केले असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने 5500 मे टन क्षमतेच्या निर्मितीचा नवा कारखाना उभा केला .याचबरोबर 30  मेगा वॅट वीज निर्मिती ही सुरू झाली. आता नव्याने विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पातून प्रतिदिन 80 हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे याचबरोबर बाहेर पडणारे सांडपाणी हे वाफेद्वारे उकळून घट्ट केले जाणार आहे. आधुनिक एनसीनरेशन बॉयलर मध्ये जाळले जाऊन त्यातून पोटॅशियम युक्त राख तयार केली जाणार आहे. ही राख अमृतशक्ती दाणेदार खतांमध्ये मिसळली जाऊन अधिक गुणवत्तापूर्ण खतांची निर्मिती करण्यात येणार आहे. याचबरोबर बॉयलरच्या वाफेवर 1.80 मेगा वॅट क्षमतेचा टर्बाईन चालून ताशी 1800 युनिट वीज निर्मिती होणार आहे. याच विजेचा वापर डिस्टलरी प्रकल्पासाठी केला जाणार आहे.

 

 

Oplus_131072

 

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. साखर ही सर्वात शुभ्र व गुणवत्तेची आहे. अनेक दिवसांच्या कष्टातून कारखान्याचे वैभवाचे दिवस उभे आहे .चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळाले आहेत. कारखान्यामुळे शेतकरी सभासद व कामगार यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. आता काहीजण अफवा पसरवणारे येतील. मनभेद करतील. त्यांना वेळीच रोखा. आपला सहकार तालुका जपण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र रहा असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

Oplus_131072

तर मा.आ डॉ तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काटकसरीने आणि पारदर्शकपणे हा कारखाना चालवला जात आहे. व्यवस्थापनाने कायम योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला आहे.

 

 

 

यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार ,मीननाथ वर्पे ,इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे ,अभिजीत ढोले ,भास्करराव आरोटे ,भाऊसाहेब शिंदे ,डॉ तुषार दिघे, विनोद हासे ,अनिल काळे, माणिक यादव, सौ मंदाताई वाघ ,श्रीमती मीराबाई वर्पे ,रामदास वाघ ,संभाजीराव वाकचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. तर व्हाईस चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस उत्पादक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

सभासदांना 30 किलो मोफत साखर मिळणार

 

थोरात कारखान्याच्या सर्व सभासदांना दिवाळीनिमित्त दरवर्षी 15 किलो साखर मोफत दिली जाते.  यापुढे सर्व सभासदांना  30 किलो साखर मोफत मिळणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करताच सर्व उपस्थित शेतकरी व सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *