संगमनेर । झुंजार न्यूज
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभ-२०२५ जिल्हास्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे भरल्या होत्या. सदर खेळाच्या स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी आय.टी.आय. मधील विद्यार्थ्यांनी विटी दांडू, रस्सीखेच या सांघिक खेळामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पंजा लढवणे या खेळांमध्ये ढगे मयूर नानासाहेब या विद्यार्थ्यांने १०५ किलो या वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच दंड बैठक या स्पर्धेमध्ये लकी दीपक पारचे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला. व त्यांची निवड विभागीय पातळीवर करण्यात आली.

नाशिक येथे स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे विभागीय पातळीच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी आय.टी.आयच्या विद्यार्थ्यांनी रस्सीखेच स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. व विटी दांडू स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सदर विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झाली आहे. या विजेता खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, आमदार सीमा हिरे, संचालिका माधवी सरदेशमुख, सहसंचालक सतीश सूर्यवंशी , अनिल गावीत, श्री मानकर , योगेश पाटील, सुनील शिंदे, क्रीडा विभागाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहल साळुंखे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष संजय पाटील, क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंह या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा.आ. बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, विश्वस्त मा.आ.डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त विलासराव वर्षे, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, अकॅडमीक डायरेक्टर डॉ.जे. बी. गुरव, मॅनेजर व्ही.बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, अमृतवाहिनी एम.बी.ए.चे डायरेक्टर डॉ.बी.एम. लोंढे, अमृतवाहिनी आय.टी.आयचे प्राचार्य विलास भाटे यांनी अभिनंदन केले.

या खेळाडू विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी अमृतवाहिनी आय.टी.आय. चे सर्व स्टाफ, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
