संगमनेर । झुंजार न्यूज
दिसंत तसं नसतं हा अनुभव नेहमी निराशादायक असतो,असं नाही.कधी कधी तो सुखदाश्चर्याचा ठरतो.भाऊसाहेब थोरात यांच्या बाबतीत तो तसाच ठरला.ग्रामीण मराठी सिनेमा बघून पुढारी आणि राजकारणी यांच्याबद्दल मनात काही वेगळी कल्पना तयार झाली होती.(अन ती फारशी सुखद नव्हती). पायात कर्रर्र करंरं वाजणार्या जाड वाहणा,डोक्याला फेटा,भरघोस मिश्या आणि सनसणीत उभी आडवी शरीरयष्टी..
समोर दिसत असलेले भाऊसाहेब मात्र नुकत्याच पाहिलेल्या संगमनेरच्या एस.टी.स्टँण्ड मधल्या गर्दीत मिसळले असते, तर ओळखूही आले नसते.पांढरा फुलशर्ट,डोक्यावर सफेद गांधी टोपी आणि धोतर या पेहरावापैकी फक्त डोक्यावरची सफेद गांधी टोपी काय ती पुढारी पणाशी नातं सांगणारी होती.साखर कारखाना,दुधसंघ,इंजिनिअरींग कॉलेज यांच्यातून अमृत उद्योगाचं साम्राय स्थापण करणार्या सहकार अधिकारी वृत्ती चेहर्यावर अजिबात वस्तीला नव्हती.त्यांच्या अधिकाराची आणि कतृर्तत्वाची ओळख करारी नजरेत काय ती पटत होती. बाकी मी कोठे एका सहकारसम्राटला किंवा काँग्रेस पक्षाच्या माजी आमदाराला भेटायला आले होते. मला तर संगमनेरच्या दुष्काळी टापूत एका वर्षांत कोट्यावधी रोपे लावण्याचा उपक्रम आणि तो ही वयाच्या 84व्या वर्षी सुरु करणार्या किमयागाराला भेटायचे होते.तेथे भाऊसाहेबांनी माझी निराशा केली नाही.पण आपली चुणूक दाखवली माझा अंदाज आणि अपेक्षाही होती.की सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात ही चळवळ टीव्हीवर आणि पुण्या मुंबईच्या वृत्तपत्रांतून त्यांना खपावयाची असावी.दंडकारण्यावर हे त्यांच्या उपकरणाचे नाव.पुस्तक लिहण्याची कल्पना वेगळेपणामुळे मनाला भुरळ घालत होती. पण प्रत्येक्ष काम पाहिल्याशिवाय त्या कल्पनेला होकार द्यायला मन तयार नव्हते.
माझं मन वाचल्याप्रमाणे भाऊसाहेबांनी अतिथ्यांच्या चहापाण्याला पुरेलशा वेळात जेमतेम दहा मिनिटात मुलाखत गुंडाळली आणि जरा हुकमांच्या स्वरात फर्मावलं.’तुम्ही आधी आमचं काम बघून घ्या.आमच्या कार्यकर्त्यांशी बोला. तुमचा इंटरेस्ट टिकला तर पुढच्या गोष्टी!’’बोलंण एकदम रोखठोक! त्यात दुसर्यांला चढव चढवून आपलं काम साधून घेण्याची चतुराई राहोच,शिष्टाचाराचा मुलामा नाही. वागण्या – बोलण्यात शहरी शिलई नाही.बोलणं अगदी थोडं आणि नेमकं स्वत:बद्दल बोलण्याच्या उत्साहापेक्षा अनिच्छाच जास्त
किंवा माणूस पारखून घेण्याची ही रीत असावी.मात्र त्या भेटीतच नाही,तर नंतरच्या भेटींमध्ये दंडकारण्य चळवळीखेरीज दुसरं बोलणं झालं नाही. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना,दूध संघ याबद्दल बोलणं त्यांनी कटाक्षानं टाळलं.इतकच काय,आडवळणानंसुध्दा एकदा आपली तो कर्तृत्वाची साक्ष नजरेखालून घालावी,असं त्यांनी सुचवलं नाही.
प्रोजक्टवर लिहायच ना ? लिहा.प्रोजेक्ट हा प्रश्न विचारा मी माझे सहकारी कार्यकर्ते लागतील ती माहिती देवू पण आपण होऊन तिची टिमकी वाजवणार नाही.वास्तविक टिमकी वाजवण्यासारख बरच काही त्यांच्यापाशी होत देशाच्या स्वातंत्र्यचळवळीतला सहभाग हा तर उठता – बसता तोंडी लावता येण्यासारखा विषय होता.वयाच्या 84 व्या वर्षी आयुष्याच्या संध्याकाळी गतकाळातल्या आठवणींच्या दिव्यांचा प्रकाश सोबतीला असतो.
पण भाऊसाहेबांच वय त्यांच कर्तृत्व त्यांचा भूतकाळ त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसला नव्हता ते नेहमी वर्तमानकाळात आणि पुस्तकांमध्ये वावरत असायचे.प्रोजेक्टव्यतिरिक्त अन्य काही बोलण झाल तर ते फक्त पुस्तकांबद्दल असायचं फोनवरच्या दोन – चार मिनिटांच्या संभाषणात सुध्दा हवापाणी खुशाली यांच्या ऐवजी काही नवे वाचले का ? अशी चौकशी व्हायची
म्हणूनच तर भाऊसाहेंबांच्या दंडकारण्य च पुस्तक करावयस वाटल हा हरित उपक्रम म्हणजे वाचन संस्कृतीचा जयजकार आहे.भाऊसाहेबांच्या टेबलावर पुस्तकांचा ढिगारा नेहमीच दिसायचा.साधनाताई आमटे यांच्या समिधापासून धनंजयराव गाडगीळ यांच्या अर्थशास्त्रावरच्या सहकारी लोकरायपर्यंतची निरनिराळ्यााविषयांवरची पुस्तके स्थानापत्र्त्र झाली होती.
वाचनाची ही चौफेरता ही भाऊसाहेबांना तुरुगांची देणगी आहे.स्वतंत्र्यपुर्व काळात चळवळीत सहभागी झाल्यामुळे त्यांना शिक्षा झाली.पण ’जंगल ते मंगल’म्हणून की काय अण्णासाहेब शिंदे यांच्यासारखा गुरुतुल्य स्नेही तुरुगांत भेटला.त्यांच्या सहवासात भाऊसाहेब वैचारिक साहित्य आणि इंग्रजी पुस्तकं वाचायला शिकले आणि त्यानंतर पुस्तक हे निव्वळ वाचत न राहता जीवन बनले.या पुस्तकवेडानंच त्यांना दंडकारण्य अभियानाची प्रेरणा दिली. झाडे लावणारा माणूस पुस्तकातून बुफिये नावाच्या फ्रेंच माणसाची विलक्षण जीवणकहाणी त्यांच्या वाचणात आली. मुलगा आणि पत्नी यांच्या लागोपाठ झालेल्या मृत्युमुळे एकाकी पडलेल्या बुफिएनं दु:खावर उतारा म्हणून झाडे लावायला सुरुवात केली.पुढची 35 वर्षे सातत्याने झाडे लावून बुफिएनं 11 मिटरचा निर्जन ओसाड प्रदेश हिरवागार करुन टाकला.
बुफिएनं भाऊसाहेबांना भारुन टाकलं दुसरं कारण म्हणजे संगमनेरची दुष्काळी रखरखीत भुमी त्यांना खटकत होती. या भुमिच्या कुशीत वाढलेल्या भाऊसाहेबांना युरोपच्या देखण्या सफरीनंतर आपला साधासुधा गाव प्यारा वाटत होता.दीड पावणेदोन वर्षांच्या आमदारकीनंतर राजकारणाला राम राम ठोकुन त्यांनी सगळं आयुष्य आपल्या गावाला अर्पन केलं.मात्र सहकाराच्या बळावर येथे अत्याधनिक तंत्र-ाान आणलं तरी इथली हिरव्या रंगाची उणीव काही दुर झाली नव्हती.
बुफिएनं ही उणीव दुर करण्याची आठवण त्यांना करुन दिली आणि चौर्याऐंशी वर्षी ह्यदयविकार आणि मधुमेह यांच्याशी झगडणारे भाऊसाहेव आपलं वय न दुखणी विसरुन झाडं लावण्याच्या योजनेची आखणी करायला बसले. पुस्तक हातावेगळे केल्यावर झोपी न जाता त्यांनी आधी योजना कागदावर घातली. दुसर्या दिवशी ती निकटवर्तीयांना सांगितली. आणि तिसर्या दिवशी गावकार्यांच्या सहकार्यांने हा प्रकल्प सुरु करण्यासाठी जाहिर सभा झाली.
पंधरा दिवसांनी सुरु होणारा पावसाळा गाठण्यासाठी भाऊसाहेबांची लगबग सुरु झाली. अमृत सहकारी साखर कारखान्यातर्फे लोकांना बिया वाटल्या जाणार होत्या शिवाय जाहिर सभेत बि बियाणे मिळविण्याचा सोपा मार्ग भाऊसाहेबांनी सर्वांना सांगितला ’’ जे फळ खाल्ल त्याची बी जपून ठेवा ’’ सगळं बी बियांण एकत्र करुन गावातल्या डोंगरांच्या रांगापासून स्मशान भुमीपर्यंत जिथे जागा मिळेल तेथे लावायचं होतं, या सामुहिक श्रमदानात भाग घेण यांना जमणार नव्हतं अशा वृध्द आजारी अपंगांनी घर्याच्या अन्नात किंवा जमत नसेल तर कुंडीत एकादं रोप लावायचं होतं.
संगमनेर मध्ये दादांच्या हाकेला हो तिथे भाऊसाहेबांना कुणी भाऊसाहेब म्हणत नाही दादा म्हणतात.आणि तेही साहेबविहेब न लावता लगेच प्रतिसाद मिळतो तसच यावेळी झाल शाळकरी मुलांपासून प्रोढांपर्यंत पाच हजारांच्या जमावान साथी हाथ बढाना लाईव्ह डेमो दाखविला
दंडकारण्याच्या शुभारंभात 14 जून 2006 एक कोटीच्या जागी जवळपास चार कोटी बिया लावून उदिष्ट गाठले गेले.त्यातून आलेली रोप बरीचशी वाळून अथवा गुरांच्या तोंडी जावून वाया गेली यावर उपाय म्हणून दुसर्या वर्षी रोप आणि फांद्या लावण्यात आल्या.त्यांनी चांगला तग धरला.त्यामुळे या उपक्रमानेही तग धरला

गेल्या चार वर्षात दंडकारण्य मधून 12 कोटींहून अधिक रोप लावली गेली आहेत.जूनचा दुसरा पंधरवडा ते जुलैचा पहिला आठवडा लोक स्वयंस्फूर्तीने दंडकारण्यासाठी राखून ठेवतात.भाऊसाहेबांच्या उर्फ दादांच्या इच्छेनुसार आत दंडकारण्य ही लोकचळवळ झाली आहे.लोकांची लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ तिथ भांडवल म्हणजे एक बी एक रोप किंवा फांदी आणि माणसाचा घाम

भाऊसाहेबांनी कटाक्षान ही चळवळ आपल्या कुटुंबाबाहेर ठेवून तिच प्रा.लि करण टाळल आहे त्यांचे चिरंजीव बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे तत्कालीन कृषीमंत्री व विद्यमान महसूलमंत्री तर कन्या दुर्गाताई तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षा पण कोणत्याही राजकीय पक्षांशी अथवा सामाजिक संघटनेशी दंडकारण्यची बांधिलकी नाही साहजिक सरकारी अनुदानाची वा सामाजिक निधीची तो निधी नाही.या उपक्रमाला एखाद्या एनजीओ चा पाठिंबा मिळाला.तर त्याच आणखी विस्तार होईल असं मी नुसत सुचवायचा आवकाश भाऊसाहेब तीव्र नाराजीच्या सुरात म्हणाले कशाला पाहिजे एनजीओ नि फिनजीओ ? आपल मूल कशाला दत्तक द्यायच दुसर्याला ? ते आपणच वाढवण चांगल पडतील थोडे कष्ट पण त्यान काय बिघडत ? स्व:त घाम गाळला तरच त्या गोष्टिवर माणसाचा जिव राहतो नाही तर तो हात झटकतो नुसत रोप लावून काम भागणार नाही.त्याच संगोपन केल पाहिजे.रक्षण केल पाहिजे हे लोकांना त्यांच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय त्यांना कळणार नाही.

दंडकरण्य मध्ये कुणीही नेता नाही.आणि पदाधिकारी नाही इथे प्रत्येक जण नेता आहे.आणि अखेर सर्व जण कार्यकर्ते आहेत.भ्रष्टाचार,दिरंगाई,शिथिलता टाळण्यासाठी भाऊसाहेबांनी सर्व शिवरस्त्यांना फाटा दिला.दंडकारण्यच त्यांनी पहिल्याच दिवशी लोकार्पण केल इथे कुणीही याव पण स्वईच्छेने या काम नाही.पटल तर खुशाल बाहेर पडाव कसलीच सक्ती नाही.

दादांनी चौर्याऐंशीव्या वर्षी हे शिवधनुष्य हाती घेतल.आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात एवढा मोठा उपक्रम हाती घेतला.तो अबाधित चालू राहण्याची खात्री आहे का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिल होत पुढच्या दहा वर्षांनी इथे जुनी पिढी निवृत्त होईल आणि नवी कामाला लागेल.हा अर्थात माझा अंदाज आहे. आशा आहे.मला भविष्यकाळाच काहीच सांगता येणार नाही पण त्याच्या भीतीने एक महत्वाच काम हाती घेण्याचे नाकारायच का ? अपघात होतात म्हणून वाहनात बसायच सोडून द्यायच का ?

गेल्या आठवड्यात सत्याऐंशी उन्हाळे – पावसाळे पाहणार्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला.पण त्यांचा भुतकाळ वाचक उल्लेख मी करणार नाही ते भूतकाळ कधीही रमले नाही.दंडकारण्यला भविष्यकाळ असावा कारण ही स्वातंत्र्योत्तर भारतातली सर्वात महत्वाची आणि सत्यान स्वाभिमानान जगण्याची लोकचळवळ आहे.असे ते म्हणायचे

कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता पण लोकसंग्राहासाठी परंपरा देव यांचा उल्लेख करुन माणसांना एकत्र आणता येतं हे त्यांना अचुक कळत होत डोळस श्रध्देला त्यांची हरकत नव्हती म्हणूनच ज्ञानेश्वरीतील नगरेची द्यावी जलाशये निर्माची महावने लावावी हे वचन दंडकारण्यच ब्रीद वाक्य आहे.

झाड लावण्यातून पर्यावरण नाही तर देशाच नितीमान सुधारता येईल असा त्यांना विश्वास होता. हेच कार्य दादांना संगमनेरकडून अपेक्षित आहे.आणि दादांच्या अनुपस्थितीत दादांकरीता ते हे कार्य आणि दंडकारण्य लोकचळवळ पुढे नेतील अशी आशा आहे.

