संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या कृषी ग्रामीण विकासाचीन जी संकल्पना मांडली त्याकडे आकृष्ठ झालेल्या त्या काळाच्या डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांपैकी एक म्हनजे भाऊसाहेब थोरात अशाच ध्येयाने प्रेरीत झालेल्या इतरांनी सहकार बरखास्त करुन राजकारण हेच सर्वस्व मानले.त्याला भाऊसाहजेब थोरात अपवाद ठरले. सहकार उभारण्यासाठी नियमीतता,शिस्त,समर्पण भावाने काम करण्याची वृत्त किती आवश्यक आहे याचा वस्तूपाठ भाऊसाहजेबांनी खर्‍या अर्थाने घालून दिला.

 

 

 

Oplus_131072

 

जवळ जवळ 50 वर्ष सतत नेतृत्व करणारे फार थोडे पुढारी होते.भाऊसाहेब थोरात हे त्या माळेचे शेवटचे मणी आहे. सत्तेपेक्षा विकास महत्वाचा आणि त्यासाठी आत्मनिष्ठा महत्वाची व आत्मनिष्ठेला स्व कतृत्वाचे बळ असायला हवे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या भाऊसाहेब थोरातांनी आयुष्यात कधीही कोणत्याही परिस्थीत आपले स्वप्न गमावले नाही. त्यामुळेच करारी स्वभावाचे आणि स्पष्ठवक्ते म्हणून ते शेवटपर्यंत टिकून राहिले. संघर्ष हाच त्यांच्या जीवनाचा अविभाय घटक राहिला.या संघर्षातून विकासाची दृष्य फळे सामान्य शेतकर्‍यांना चाखता यावी म्हनून आपले अवघे आयुष्य वेचणार्‍या नेत्याचा सहकार चळवळीला कधीही विसर पडता कामा नये.संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील गावपातळीचरील सेवा संस्थाचा अध्यक्ष ते राष्ट्रीय पातळीवरील भारतीय वित्त महामंडळाचे संचालक असा विकासाचा मोठा पल्ला गाठतांना रचनात्मक कार्याचा उत्तम आदर्श भाऊसाहेबांनी स्वत; आचरणातून घालनू दिला.

 

 

 

 

Oplus_131072

स्वच्छ चारित्र,सहकाराबद्दल ध्येयवाद,आर्थिक शिस्त,संयम आणि नितीमूल्यांची जपवणूक ही पंचसूत्री त्यांनी आयुष्यभर जपली.किंबगुणा यातच भाऊसाहेबांच्या जीवनाचे सार दडले आहे.मूळच्या डाव्या विचार सरणीच्या या नेत्यांने आयुष्य काँग्रेसच्या सत्ताधारी परवाहात व्यतीत करुनही श्रमिकांशी असलेली नाळ तुटू दिली नाही.कम्युनिष्ठ विचारांचा कार्यकर्तेा हीच भाऊसाहेबांची पहिली ओळख होती.स्वातंत्रलढ्याच्या तुरुंगवासानंतर राष्ट्र सेवा दलाच्या ते गांधीींच्या विचाराकडे व पुढे काँग्रेसच्या प्रवाहात ओढले गेले.देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा सहकाराचे महत्व या तीघानांही पटले होते.

 

 

Oplus_131072

 

याच वातावरणात भाऊसाहेबांची जडण – घडण झाली.प्रदीर्घ आयुष्यात एकदाच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. व विधीमंडळात प्रवेश केला मात्र ती फक्त हजेरी ठरली.यातून समाजाची फार उन्नती होणार नाही अशाच मताचे ते होते.म्हणूनच राजकारनाची वाट तेथेच सोडून त्यांनी पुन्हा सहकाराच्या माध्यमातून रचनात्मक कार्य केले.मात्र कॉग्रेसशी निर्माण झालेली राजकीय नाळ तुटू दिली नाही. २२ वर्षापूर्वी काँग्रेसचे विभाजन झाले.

 

 

 

Oplus_131072

 

 

त्यावेळी पंडीत नेहरू व इंदिरा गांधी यांच्याशी एकनिष्ठता ठेवली.राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना कधीही मोह झाला नाही.किंबगुणा अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभा आहे तो केवळ भाऊसाहेबांमुळेच.कार्येकर्ते घडवण्यावर त्यांनी कायम भर दिला. संगमनेर तालुक्याची आजची वाटचाल लक्षात घेता  पदोपदी दादांची आठवण करुन देते.तालुक्यातील चार पिढ्या त्यांनी सहकाराच्या चळवळीत आणल्या. आणि त्यांच्या जोतरदार संस्थांचे जाळे निर्माण झाले.ही वाटले तितकी सोपी गोष्ट नव्हती.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *