आ अमोल खताळ यांच्यासमोरच ग्राम स्थानी केल्या ग्रामपंचायत प्रशानाच्या तक्रारी
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील चिखली ग्राम पंचायतीच्या ग्रामसेविकेच्या तक्रारीचा पाढा उपोषणकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर वाचला .त्या नंतर त्या ग्रामसेविकेची बदली करावी.तसेच चौकशी करण्यात यावी असे आदेश आ अमोल खताळ यांनी संगमनेर पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकार्यांना दिल्यानंतर चिखली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या समोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सोडले
ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा न घेता ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला. तसेच खोटी माहिती देवून साठवण तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केली, इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जलजीवन योजने च्या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणार्यां व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, जलजीवन साठवण तलावा एवजी पर्याय व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी.
या विविध मागण्यांसाठी चिखली ग्रामपंचायतीसमोर .भारत हासे, संजय नेहे,उमेश हासे, गणेश हासे रमेश हासे, किसन फटांगरे,सदाशिव हासे,बाबासाहेब हासे, नंदू हासे, किशोर हासे,बाळासाहेब हासे, व भास्कर हासे अरुण हासे आदी ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणाला बसले होते
उपोषणस्थळी आ.अमोल खताळ यांनी भेट दिली. त्यांनी त्या उपोषणकर्त्यांच्या मागण्यां समजावून घेतल्या. त्यानंतर या उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडविण्या बाबत अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी ग्रामसेविकेच्या विरोधात आ खताळ यांच्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला कामांसाठी अडवणूक केली जाते आणि या ग्रामपंचायत प्रशासना मुळे आम्हला खूप त्रास होत आहे आशा व्यथा मांडल्या.
संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी १० दिवसामध्ये ग्रापंचायत कारभाराची चौकशी करून तो अहवाल सादर करावा.ज्या व्यक्तीचे घरकुल पाडले आहे त्याची रीतसर पोलीसात तक्रार द्या पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देतो व चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांना तात्काळ पदमुक्त करा आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करा असे निर्देश संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ठाकूर यांना आ.खताळ यांनी दिले.त्यानंतर उपोषण कर्त्यांनी दोन दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण सोडले
