पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व शिवाजीराव थोरात दूध उत्पादक सहकारी संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध होवून या संस्थेच्या चेअरमनपदी गणेश संपत जाधव तर व्हा चेअरमनपदी देवराम मना हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

स्व शिवाजीराव थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळीत हिरीरीने भाग घेतला होता . आपल्या पानोडी गावासह शेजारी गावामध्ये सहकाराची मुर्हुत रोवली त्यात गावातून शेतकऱ्यांना ‘ दूध उत्पादकांना व सर्व सामान्यांना आर्थिक लाभ व्हावा या दृष्टीने सहकारी संस्था उघडल्या . त्या संस्था पारदर्शक व स्वच्छ पध्दतीने कारभार करत जपल्या आज अनेक ठिकाणी सहकारी संस्था बंद पडल्या मात्र पानोडी गावातील सर्व संस्था स्थावर व मजबूत राहिल्या . त्या संस्था पुढे संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक तथा उपसंरपच विक्रम थोरात यांच्या नेतृत्वाखालील पारदर्शक पध्दतीने चालू असून नुकत्याचं झालेल्या स्व शिवाजीराव थोरात दूध उत्पा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक पारदर्शक व बिनविरोध झाल्याने सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला .


नुतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख , व्हा चेअरमन राजेंद्र चकोर , संस्थेचे व्यवस्थापक एकनाथ खेडकर , साहाय्यक मारुती पाबळ यांनी अभिनंदन केले .
