संगमनेर । झुंजार न्यूज
राज्यांमध्ये सहकार चळवळीतील अग्रगणी असणाऱ्या ” राजहंस ” संगमनेर तालुका दूध संघाच्या माध्यमातून शासकिय अनुदान ५ व ७ रुपयेप्रमाणे ५ महिन्यांचे २७ कोटी ८१ लाख ३८ हजार रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदान बँक खात्यात जमा झाल्याची माहिती संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली .

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती अशी की, राज्य सरकारने थकीत असलेले जुलै , ऑगस्ट , सष्टेबर या तीन महिन्यांचे ५ रुपये प्रति लिटर दूध अनुदान १४,५०,२८,३०० तर आक्टोबर व नोव्हेबर या दोन महिन्यांचे ७ रुपये प्रति लिटर दूध अनुदान १३,३१,१००१२ प्रमाणे सोमवारपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे . राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2024 च्या निर्णयानुसार, सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी ५ रुपये आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी ७ रुपये प्रति लिटर दराने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यांचा फायदा दूध उत्पादकांना झाला आहे .

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मजबूती मिळावी या उद्देशाने ” सहकार चळवळ ” उभी केली त्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पुरक जोडधंन्दा म्हणून दूध व्यवसायाची संकल्पना आली त्यातून ” राजहंस ” ची निर्मिती झाली . पारदर्शक व काटकसर पध्दतीने राजहंस ची घोडदौड सुरु झाली गेल्या ४९ वर्षात राज्यात नव्हे तर देशात ही दूध संस्था नावारूपाला आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे , दूध उत्पादकांचे हित जोपासून त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यात ” राजहंस ” सदैव तप्तर दिसत .

भविष्यात संगमनेर तालुका दूध संघ ( राजहंस ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन त्यांच्या पाठिंशी भक्कमपणे उभे राहून दूध व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून नव नव योजना राबविण्यात येत आहे .
रणजितसिंह देशमुख ( चेअरमन , संगमनेर तालुका सह. दूध उत्पा संघ )

