अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशातील नामांकित शिक्षणसंस्था” – श्री. कुलकर्णी

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे गेल्या ४२ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले प्रतिष्ठित शिक्षणसंस्थान आहे. संगणक अभियांत्रिकी विभागात आय.एस.टी.ई (ISTE) आणि आय.ई.ई.ई-सी.एस.आय (IEEE-CSI) च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हॅकाथॉन – टेक प्रग्यान २०२५ चे आयोजन २७ मार्च २०२५ रोजी करण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यांमधून एकूण **१९० संघांनी सहभाग नोंदवला , त्यापैकी ८० संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. सलग १२ तास चाललेल्या या कोडिंग स्पर्धेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटका, दिल्ली आणि महाराष्ट्र येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.   

 

 

Oplus_131072

 

 

टेक प्रग्यान २०२५ चे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, अशिदा इलेक्ट्रोनिक्सचे मुख्य तांत्रिक अधिकारी श्री. सुयश कुलकर्णी, मानव संसाधन व प्रशासन प्रमुख श्रीमती मानसी कुलकर्णी, मेकानिकल विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे आणि रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

   

 

Oplus_131072

 

उद्घाटन प्रसंगी सुयश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत कौशल्य वृद्धी करावी, असे प्रतिपादन केले. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले शिक्षणसंस्थान असून, येथे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची संधी उपलब्ध होते, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

Oplus_131072

 

स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

 

प्रथम पारितोषिक (₹५०,०००/-) – पिकाचू संघ, अ‍ॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट, इंदोर, द्वितीय पारितोषिक

 

(₹३०,०००/-) – ट्रायटेक संघ, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, तृतीय पारितोषिक

 

(₹२०,०००/-) – आयडीयेशनएक्स संघ, के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक, विशेष पारितोषिक

 

(₹५,०००/- प्रत्येकी) – ऐक्यम संघ, प्रवरा रुरल अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी व प्रकाल्प्झ संघ, के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक

 

 

 

Oplus_131072

 

याशिवाय अंतिम फेरीत पोहोचलेल्या १५ संघांना प्रत्येकी ₹१,०००/- आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण पारितोषिक आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., मुंबई यांनी प्रायोजित केली होती. तसेच, पायबायथ्री (pibythree), जीनोसीस, फिनलेटीक्स, एसदेमोन, नेटलिप आणि प्रवरा इन्फोटेक यांसारख्या विविध कंपन्यांनी एकूण ₹१,५४,०००/- ची प्रायोजकता दिली असल्याची माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर यांनी दिली. टेक प्रग्यान २०२५ च्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. विक्रम अभंग, प्रा. कविता रहाणे, डॉ. स्वाती भोंडे आणि डॉ. दीपक पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

 

 

 

Oplus_131072

 

टेक प्रग्यान २०२५ च्या यशस्वी आयोजनासाठी आणि विजेत्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *