संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ११ मे रोजी होणार असून, १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Oplus_131072
पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.. अमृतनगर ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Oplus_131072
अर्ज मागे घेण्यासाठी १५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ पर्यंत मुदत राहील. उमेदवारांची यादी व चिन्हवाटप २ मे २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
Oplus_131072
या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदारयादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *