शिर्डी । झुंजार न्यूज

प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमही पुणेस्थित राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार ९ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे.
राहाता प्रशासकीय इमारतीत (राहाता तहसील कार्यालय) निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री स्वीकृती सुरू राहील, प्राप्त अर्जाची
छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार १५ एप्रिल ते २९ एप्रिल या
.
कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार अमोल मोरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *