संगमनेर । झुंजार न्यूज
गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या वाणीतून आज पासून नऊ दिवस श्रीराम कथा होत आहे त्या निमित्त संगमनेर शहराच्या विविध भागा तून ढोल ताशाच्या गजरात सनई चौघडा च्या स्वरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेने संपूर्ण संगमनेर शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या वाणीतून आज एक एप्रिलपासून९एप्रिल पर्यंत श्रीराम कथा सुरू होत आहे. त्या कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेर शहरा तील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात राधाकृष्णाजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रभू श्रीरामची आरती करण्यात आली. प्रभू रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात सनई चौघ ड्याच्या स्वरात भव्यदिव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. महिला भगिनी डोक्यावर तुळस घेऊन भगवंत नामाचा जप करत या याशोभा यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. “राम आयेंगे आयेंगे आ जायेंगे शबरी रामललाच्या गाण्यावर महिलांनी टाळ आणि टाळ्यांचा ठेका धरत भजन गात होत्या.
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा रंगार गल्ली लालबहादूर शास्त्री चौक नगरपालिका, बाजारपेठ तेली खुंट मेनरोड, , विठ्ठल मंदिर चावडी अशोक चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बस स्थानक नाशिक रोड मार्गे मालपाणी लॉन्स अशी ही भव्य दिव्य शोभायात्रा निघाली होती
गोत्सव राधाकृष्णजी महाराज यांच्या वाणीतून आज मंगळवारपासून श्रीराम कथेला सुरुवात होणार आहे त्या निमित्त निघालेल्या शोभायात्रेत आमदार.अमोल खताळ यांच्या सुविध्य पत्नी निलमताई खताळ या स्वतः सहभागी झाल्या होत्या त्यांनी स्वतः प्रभू श्रीराम यांची पालखी खांद्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या .महिला भाविकांबरोबर सौ खताळ यांनी फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला.
संगमनेरात श्रीराम कथेमध्ये पहिला दिवस श्रीराम कथा महात्मे, दुसरा दिवस शिव पार्वती विवाह, तिसरा दिवस श्रीराम जन्मोत्सव, चौथा दिवस बाललीला आणि धनुष्य यज्ञ पाचव्या दिवशी श्रीरामलला आणि माता जानकी यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे तर सायंकाळी मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरणार आहे, सहावा दिवस वनवास प्रसंग संवाद , सातवा दिवस श्रीराम भरत शबरी भेट, आठवा दिवस रामचरित्र लंका विजय ,नववा दिवस श्री प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा होऊन या राम कथेची सांगता होणार आहे
