आश्वी । झुंजार न्यूज

लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा व ४० गाव परिसरातील आश्वी बु॥ व आश्वी खुर्दला जोडणारा प्रवरा नदीवर ४० वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आल्याने आश्वी व परिसरातील गावांना या बंधाऱ्यांचा मोठा फायदा होवून बाराही महिने आश्वी प्रवरामाई मध्ये जलमय असल्याने या परिसराचे नंदनवन झाले . त्यात निमित्ताने जलसंपदाच्या माध्यमातून काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते ‘ जल ‘ पूजन करण्यात आले .
Oplus_131072
जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात विकासात्मक काम होत असून जणुन काय ? विकासची प्रवरामाई सारखी गंगोत्रीचं वाहत आहे . पदमविभूषण स्व बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने प्रवरा व ४० गावे परिसरातील अनेक ठिकाणी प्रवरानदीवरवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले यामुळे हा परिसर हिरवामय झाला .
Oplus_131072
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ व आश्वी खुर्द येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर जलसंपदा विभागामार्फत राजेद्र मांढरे व जि प माजी सदस्य सौ कांचनताई मांढरे तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक जऱ्हाड यांच्यासह पत्नी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. 
Oplus_131072
यावेळी जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक सुषमा वाईगडे, दीपाली सव्वासे, जेष्ठ नेते भगवानराव इलग , शिबलापूर संरपच दिलीप तबा मुन्तोंडे , युवा नेते भारतराव गीते , मोहीतराव गायकवाड , रामभाऊ भुसाळ, डॉ. दिनकर गायकवाड, विजयराव चतुरे, अशोकराव म्हसे, अजय ब्राह्मणे, सरुनाथ उंबरकर, अॅड. रोहिणी निघुते, माधवराव गायकवाड, अनिल म्हसे , भाऊसाहेब जऱ्हाड, कारभारी म्हसे, शाळिग्राम चंद, आण्णासाहेब जऱ्हाड, मंच्छिंद्र गायकवाड, विनायक जऱ्हाड , भीमा शिंदे उपस्थित होते
Oplus_131072
प्रवरा नदीपात्रावर कोल्हारपर्यंत ६ ते ७ बंधारे बांधले गेल्याने लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली. शालिनीताई विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून विकासकामांचा आढावा घेतला जातो. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या चाऱ्या पुन्हा उकरून त्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने पाटाचे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed