संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम राम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा जयजयकार करत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी आ अमोल खताळ आणि त्यांच्या सुविध्य पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी आ खताळ यांनी रामायण पाहण्याच्या जुन्या लहानपणच्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त श्रीरामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या मंदिरात रामभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.आअमोल खताळ यांच्या हस्ते सर्वप्रथम राम लक्ष्मण आणि सीता यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली आणि त्यांनी तमाम संगमनेरकरांना रामनवमी च्या शुभेच्छा दिल्या

 

 

प्रभू रामचंद्र की जय सिया वर रामचंद्र की जय असा जयघोष करत परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी रामजन्मो उत्सवाचा पाळणा आ खताळ आणि सौ खताळ यांच्यासह महिलांनी हलविला यावेळी अनेक महिलांनी राम भक्तांनी ओव्या गाऊन राम जन्मोत्सवाचे स्वागत केले. यावेळी यावेळी भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुभाष कोथंबिरे राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर भालेकर योग राज परदेशी अक्षय थोरात अनिकेत चांगले मुन्ना जोशी, राम वामन विनायक तांबे शुभम लहामगे उपासनी योगेश मांगलकर वरद बागुल शुभम डावखरे, गिरीश मेंद्रे, विलास परदेशी चेतन तारे अजित खेगले, तुषार गीते, यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

संगमनेर शहरातील उपासनी गल्ली मध्ये असणाऱ्या उपासनी बंधूंच्या काळाराम मंदिरात जाऊन आमदार खताळ आणि त्यांच्या सुविद्यपत्नी निलम खताळ यांच्या हस्ते पूजा करून महाआरती करण्यात आली यावेळी उपासनी परिवाराच्या वतीने वैभव उपासनी,विशाल उपासनी, सुहास उपासनी ॲड.अजिंक्य उपासनी प्रवीण कर्पे,अक्षय कर्पे, ॲड.,गणेश पगडाल,निलेश उपासनी,विजय बेल्हेकर, उपस्थित होते.
आमदार खताळ व त्यांच्या सौभाग्यवती निलम खताळ यांचे स्वागत केले

 

श्रीरामनवमीच्या निमित्ताने चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिर व मोठा मारुती मंदिर परिसरामध्ये विघ्नेशाराजे किशोर आहेर या शाळकरी मुलीने रामायणातील अनेक प्रतिकृती रेखाटल्या होत्या. त्या सर्व कलाकृतीची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी करून तिचे कौतुक केले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *