शिबलापूर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिबलापूर येथील भैरवनाथ महाराज यांचा गुरुवार दि १० एप्रिल ते शुक्रवार ११ एप्रिल २०२५ दोन दिवशीय यात्रोत्सव होणार असल्याची माहिती यात्रोत्सव आयोजकांनी दिली .

संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील शिबलापूर येथील यात्रा फार महत्वाची समजली जाते भैरवनाथ महाराज हे नवसाला पावणारे असून गुरुवार दि . १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुक ,

दुपारी ४ वाजता बैलगाडा शर्यती संध्याकांळी ९ वाजता लोकनाट्य तमाशा ( दिपाली पुणेकर ) तर शुक्रवार दि ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हजेरी , दुपारी ४ वाजता हगामा होणार आहे .

तरी शिबलापूर व परिसरातील भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे .
